Home
Home चंद्रपूर 100 रेड डेज अगेन्स चाईल्ड मॅरेज भवानजीबाई स्कूल मे हृदय संस्था के...

100 रेड डेज अगेन्स चाईल्ड मॅरेज भवानजीबाई स्कूल मे हृदय संस्था के माध्यम से कार्यशाळा संपन्न..

0
121

HELLO CHANDA NEWS

       चंद्रपूर,(का. प्र.) : जस्ट राईटस् फ़ॉर चिल्ड्रन यांच्या सहयोगी संस्था रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन (रुदया) गडचिरोलीच्या वतीने एक्सिस टू जस्टीस प्रकल्पाच्या माध्यमातून भवानजीबाई हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी बाल विवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत मार्गदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आला.

                          त्या प्रसंगी प्रमुख उदघाटक व मार्गदर्शक म्हणून विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, सुधीर इंगळे यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समिती अध्यक्ष क्षमा बासरकर, बाल कल्याण समिती सदस्य डॉक्टर ज्योत्स्ना मोहितकर, रूदय संस्था सरसंचालक काशिनाथ  देवगडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून प्रतिभा मडावी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत बाल विवाह मुक्त भारत या कार्यक्रमांची शपथ घेऊन, मोकाशे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमा अंती सर्व मान्यवरा सोबत 800 विध्यार्थी यांनी प्रभागात जनजागृती रॅली काढण्यात आली.

              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एक्सिस टू जस्टिस प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रिया कांबळे , समुपदेशका रांनी मेश्राम, क्षेत्रीय अधिकारी सोनम लाडे, क्षेत्रीय अधिकारी शशीकांत मोकासे, रश्मी भोयर , विधी सल्लागार एडवोकेट अक्षय गेडाम, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने 800 विद्यार्थ्यांच्यासह कार्यक्रमात सहभागी झाले.

                   सदर कार्यक्रमाचा 100 दिवस बालविवाह विरोधी अभियान 11 ऑक्टोबर 25 पासून ते 26 जानेवारी 2026 पर्यंत राबविणे असून
या अभियानाचा उद्देश सलग्न सर्व शासकीय विभाग सामाजिक संस्था शासकीय संस्था स्वयंसेवी संघटना धार्मिक नेते व समाजातील नागरिक विवाह सोहळ्याला मदत करणाऱ्या सर्व सामाजिक व व्यवसायिक यंत्रणा यांना एकत्र आणून बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प राबविणे आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here