Home चंद्रपूर बालाजी हायस्कूल बामणी येथे बालविवाह मुक्त भारत कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयावर...
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का.प्र.) : बालाजी हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज बामणी येथे असेच तू जस्टीस फॉर चिल्ड्रन प्रकल्प चंद्रपूर रुदय संस्था. जिल्हा महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने संयुक्तिकरित्या चंद्रपूर जिल्हा बालविवाह मुक्त व्हावा, बालविवाह जनजागरण व्हावे, वाढत्या बालविवाहाचे प्रमाण घटावे या उद्देशाने रथयात्रेचे आयोजन करून मार्गदर्शन परिक्रमा सुरू करण्यात आली.
त्याप्रसंगी बालाजी हायस्कूल बामणी येथे माननीय मुख्याध्यापिका पंधरे मॅडम यांच्या परवानगीने सदर रथयात्रेला शाळेत प्रवेशित करून तेथे कार्यक्रम घेण्यात आला ज्यामध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार बालमजुरी बालकांची तस्करी व बालविवाह यासारख्या विषयावर तसेच चांगला स्पर्श वाईट स्पर्श वाईट स्पर्श त्यापासून वाचायचे कशे शारीरिक स्वच्छता मानसिक स्वच्छता व सामाजिक स्वच्छता या कार्यक्रमाचे विषय होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय पंधरे मॅडम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शशिकांत मोकाशी क्षत्रिय अधिकारी रुदय संस्था, रेल्वे चाइल्ड हेल्पलाइन चे सुपरवायझर भास्कर ठाकूर, चाल हेल्पलाइनची बाकी कर्मचारी दिलासा ग्राम कडून कविता देरकर प्रामुख्याने उपस्थित होते या क्रमाच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक शशिकांत मोकळे यांनी बालकांना बालकांचे कायदे त्यांचे अधिकार आपले कर्तव्य व शून्य ते 18 वर्षे वयोगटातील सर्व बालकांसाठी असलेली उपयुक्त माहिती बालविवाह कायदा त्यावर असणाऱ्या शिक्षेची तरतूद मोबाईलचा दुरुपयोग या विषयावर सखोल असे केळीवेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले.
हेल्पलाइन चे सुपरवायझर बासर ठाकूर यांनी साइल हेल्पलाइन कोणत्या पद्धतीने काम करते चाइल्ड हेल्पलाइनच्या टोल फ्री नंबर काय व महाराष्ट्र शासनाच्या भारत सरकारच्या वतीने 40 हेल्पलाइन कशा पद्धतीने कार्यान्वित केले गेली आहे याची मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अंतिम चरणात अध्यक्ष भाषणात पंधरे मॅडम यांनी बालकांना ज्या काही सूचना मान्यवरांनी दिल्या.
त्याचे पालन कसे करता यावे व आपले जीवन कसे सुंदर व सुखरूप बनवता येईल येणारे बोर्ड परीक्षा यावर भर देत या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी शाळेची विद्यार्थी शिक्षक वृंद व शाळेतील सर्व सहकारी यांनी भाग घेतला.
कार्यक्रमाचे सरते शेवटी बालविवाह शपथ घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता देरकर तर आभार प्रदर्शन मडावी यांनी केले. 
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*