Home
Home चंद्रपूर आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा..! आ. मुनगंटीवार...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा..! आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे १०३ कोटी ८ लाख ६३ हजार ३६१ रुपये धान चुकारे मंजूर. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनजी भुजबळ यांना लिहिले होते पत्र.

0
166

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(का. प्र.) – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

             चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेंतर्गत धानाचे प्रलंबित चुकारे तातडीने मिळावेत, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनजी भुजबळ यांना पत्र लिहीले होते.

       तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव. अनिल डिगीकर यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धान खरेदीचे १०३ कोटी ८ लाख ६३ हजार ३६१ रुपये इतके चुकारे मंजूर करण्यात आले आहेत.

           आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीची दखल घेत प्रधान सचिवांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात धानाच्या चुकाऱ्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले होते.

               त्यानुसार दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने संबंधित निर्णयाची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये खरीप पणन हंगाम २०२५-२०२६ मधील धानाचे चुकारे देण्यात आले आहे.

                        “खरीप पणन हंगाम २०२५-२६ मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत १८ जानेवारी २०२६ पर्यंत एकूण ४,३५,१४७.०५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीचे १०३,०८,६३,३६१ रुपये इतके चुकारे शासनाच्या निकषानुसार प्राप्त झाले असून, त्याद्वारे १४,२२९ शेतकऱ्यांना ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अदा होणार आहे.

              धान खरेदी होऊनही अनेक शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिली होती. त्याचवेळी प्रलंबित रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली.

या मागणीला प्रधान सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

       यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची तातडीने दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी ना. छगनजी भुजबळ यांना पत्र लिहीले. ‘चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात आधारभुत किमतीनुसार ५ डिसेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष धान खरेदी सुरु झाली. आजपर्यंत २३६९ रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे
४७४२८६.४६ क्विटंल धानाची खरेदी करण्यात आली होती. पण शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या धानाचे चुकारे मिळालेले नाहीत,’ याकडे आ. मुनगंटीवार यांनी पत्रामधून लक्ष वेधले होते.

         या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मंजूर करण्यात आले असून त्याबद्दल कायम शेतकऱ्याप्रती संवेदनशील असलेले नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here