Home
Home चंद्रपूर वेकोलि मुख्यालयात प्रकल्पगस्तांच्या विविध विषयांवर बैठक संपन्न. अधिग्रहित जिल्ह्यात नोकरी देण्याची आग्रही...

वेकोलि मुख्यालयात प्रकल्पगस्तांच्या विविध विषयांवर बैठक संपन्न. अधिग्रहित जिल्ह्यात नोकरी देण्याची आग्रही मागणी. तांत्रिक डिप्लोमा व डिग्री धारकांना वर्षपूर्तीनंतर शैक्षणिक योग्यतेनुसार सामावून घेणार. आयटीआय धारकांना सुद्धा योग्यतेनुसार सेवेत सामावून घेण्यासाठी आढावा घेणार.

0
14

HELLO CHANDA NEWS

    चंद्रपूर,(का. प्र.) : रविभवन नागपूर येथे, माननीय हंसराज अहिर, पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा पूर्व अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांची वेकोली अध्यक्ष तथा प्रबंधनिर्देशक, नागपूर,  हेमंत पांडे यांच्यासमवेत प्रकल्पग्रस्तांच्या विविध विषयांवर बैठक संपन्न झाली.

         यावेळी भूमी व मानवसंसाधन महाप्रबंधक, निदेशक तांत्रिकी, अन्य वरिष्ठ वेकोली अधिकारी तथा प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

      प्रकल्पग्रस्तांना लगतच्या क्षेत्रातच किंवा जिल्ह्यातच पदस्थापना देण्यात यावी आणि उच्चशैक्षणिक पात्रता धारकांना अनिवार्यतेने भूमिगत खदाणीत पोस्टिंग देऊ नये यावर चर्चा करण्यात आली.

     यावर तांत्रिक डिप्लोमा व डिग्री धारकाना एक वर्ष यू.जी. सेवेनंतर शैक्षणिक पात्रतेनुसार पदस्थापना देण्यात येईल तसेच यापूर्वीच्या बैठकांच्या फलश्रुतीस्वरूप वेकोली अंतर्गत होणार्या विविध वरिष्ठ पदभरतीसाठी डिपार्टमेंटल उमेदवारांनाच पात्रता असल्याची व मागील दोन वर्षात असंख्य प्रकल्पग्रस्त युवकांना मायनिंग सरदार म्हणून पदोन्नती देण्यात आल्याची माहिती प्रबंधनाद्वारे देण्यात आली.

  आय.टी.आय. डिप्लोमा धारकांचा सुद्धा तांत्रिक योग्यतेच्या आधारावर नियुक्तसाठी आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

     प्रकल्पधारक शेतकर्याच्या नाती (ग्रँड डॉटर) ला नोकरी तथा महिला सातबारा धारकच्या नातू/नाती यांना तसेच सुनेला नोकरी आणि सुरक्षाकर्मी पदस्थापनेची वयोमर्यादा 35 वर्षांवरून 40 वर्ष करण्याबाबत प्रस्ताव कोल इंडिया ला पाठविला असल्याची माहिती प्रबंधनाकडून बैठकीत देण्यात आली.

 कोल मंत्रालयाच्या निर्देशावरून मुख्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या नवीन कोर्ट मॅटर SOP चे सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून तत्परतेने कार्यान्वयन होत नसल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला असता याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात आले

   बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, पोवनी, चिंचोली, वणी क्षेत्रातील विरूर (गाडेगाव), नीलजई, कोलगाव, ऐनक, वणी नॉर्थ क्षेत्रातील उकणी, कोलार पिपरी, पिंपळगाव, उमरघाट (घोन्सा) येथील उर्वरित जमिन अधिग्रहणाच्या विषयावर चर्चा करण्यात आली असता काही ठिकाणी CMPDI द्वारे फेरसर्वे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

   बल्लारपूर क्षेत्रातील विधी अधिकारी अनुपस्थितीमुळे प्रकल्पधारकांचे मंजूर नोकरी प्रस्तावांची तसेच नवीन कोर्टमॅटर SOP नुसार प्रस्ताव प्रलंबित असल्याच्या विषयाबद्दल चर्चेत क्षेत्रीय मानव संसाधन अधिकारी यांना याबाबत अधिकृत करण्यात येईल असे बैठकीत सांगण्यात आले.

            माजरी क्षेत्रातील शिवनी (धोबे) खुली खदान व बल्लारपूर क्षेत्रातील चिंचोली रिकोस्ट परीयोजनेत नौकरीसह अधिग्रहण करण्याबाबत आग्रही चर्चा संपन्न झाली.

     प्रबंधनाकडून यादोन्ही प्रकल्पात नौकरीसह अधिग्रहण करण्याबाबत असमर्थता व्यक्त करण्यात आली असता याबाबत नौकरीसह अधिग्रहण करण्याच्या पर्यायावर प्रबंधानाने गांभीर्याने विचार करावा असे सांगण्यात आले.

         मृत कामगाराच्या बहीण किंवा भावाला नोकरी देण्याची NCWA 11 मधील सुधारित तरतूद 2021 पासून लागू करन्याबाबत यावेळी आग्रही चर्चा करण्यात आली व ज्या कामगारांच्या प्रश्नाला घेऊन ही तरतूद निर्माण करण्यात आली त्यांना ती लागू होत नसल्याबद्दल अहिर यांनी नाराजी व्यक्त केली असता, याबाबत 2021 पासून ही तरतूद लागू करण्यासाठी कोल इंडियाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

                     मागील बैठकांमध्ये झालेल्या चर्चेनुसार वणी क्षेत्राच्या अंतर्गत वोल्वो ट्रैनिंग सेंटर सुरु करण्यात आल्याचे प्रबंधनाकडून सांगण्यात आले. 

      या सेंटरवर प्रकल्पग्रस्त गावातील जड वाहतूक परवाना धारक युवकांना ट्रेनिंग देऊन या कुशल कामगारांना राज्य शासनाच्या स्थानिकांना 80 टक्के रोजगार धोरणा अंतर्गत वेकोली अधिनस्त ओबी उत्खनन कंपनीमध्ये रोजगार प्रदान होण्यासाठी संधी निर्माण होणार आहे.

              यावेळी बैठकीत जेष्ठनेते कुशालजी बोंडे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन एकरे,   डॉ. अंकुश आगलावे, अॅड. प्रशांत घरोटे, मधुकर नरड, धनंजय पिंपळशेंडे, पुरुषोत्तम लांडे, संतोष उरकुडे, निलेश ढेंगळे, नेताजी भोयर, कल्पना टोंगे, सरपंच ऐनक व अन्य प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here