Home चंद्रपूर थोर क्रांतिकारक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वी जयंती भाजपा चंद्रपूर...
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने थोर क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्व विचारांचे पुरस्कर्ते स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त भाजपा महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे अभिवादन व मानवंदना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग, संघर्षमय जीवन आणि स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी विकास खटी, रत्नाकर जैन व प्रकाश आवळे यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या क्रांतिकारक विचारांची प्रेरणादायी मांडणी केली.
त्यांनी सावरकरांचे विचार आजच्या युवकांसाठी मार्गदर्शक असून राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवनपटावर आधारित विशेष व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. सावरकर यांच्या जीवनातील संघर्ष, अंदमान कारावासातील कठोर शिक्षा, साहित्य निर्मिती आणि राष्ट्रसेवेचा प्रवास या माध्यमातून उपस्थितांना अनुभवता आला.
या व्हिडीओमुळे कार्यक्रमाला अधिक भावनिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. उपस्थितांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाला माजी शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप महानगर महामंत्री रवींद्र गुरनुले, नामदेव डाहुले, सविता दंडारे, विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर, उपाध्यक्ष बलराम डोडाणी, ज्येष्ठ नेते रत्नाकर जैन, गिरीश अणे, प्रकाश आवळे, विकास खटी, गटनेता शेखर शेट्टी, नगरसेवक भालचंद्र दानव, नगरसेविका आशा देशमुख, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी, किसान आघाडी अध्यक्ष संजय बुरघाटे, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, अरुण तिखे, सुधीर कारंगल, सुमित बेले, प्रवीण गिलबिले, कामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार आकापेल्लीवार, प्रमोद शास्त्रकार, राकेश नाकाडे, बाळू कोल्हनकर, राकेश बोमनवार, रज्जन ठाकूर, शेखर देशमुख, शालू कन्नोजवार, विनोद पेंलीवार, भाऊराव उताणे, अंजु तोरे, भाग्येश्री येरणे, श्रावण खडेलवार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*