HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र) : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पुर्व अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 10 फेब्रुवारी रोजी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली व शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या जयंती अथवा पुण्यतिथी निमीत्त चंद्रपूर येथील स्मारक स्थळावर होणाऱ्या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबत स-सन्मान आमंत्रीत केले.
हंसराज अहीर यांची सन 2022 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती द्वारा नियुक्ती करण्यात आली होती.
या संवैधानिक पदाचा 3 वर्षाचा कार्यकाळ डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाल्याबद्दल अहीर यांनी सदर भेटी प्रसंगी राष्ट्रपती महोदयांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले. 


*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*