HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : गोंडपिंपरी आज रोजी गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की, गडचिरोली येथुन तेलंगणा राज्यामध्ये 5 पिक अप वाहनांमधे गोवंशीय गाय व बैल या जनावरांची अवैधरित्या ,कत्तलीसाठी वाहतूक होणार आहे.
अशा माहितीवरून मौजा वढोली येथे नाकाबंदी केली असता सकाळी 06:30 वाजताचे सुमारास संशयित पिक अप वाहने येताना दिसले समोरील वाहनास हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला.
असता समोरील वाहन चालकाने वाहन थांबवले असता चालकास व त्याच्या बाजूला बसलेल्या इसमास नाव, पत्ता विचारले असता त्याने आपले नाव मोहसीनआयुब खान वय 40 वर्ष रा. वाकडी, जि. असिफाबाद,
मोहम्मद मंजूर आली वय 42 वर्षे रा. माजीदवाडा, ता. वाकडी, जि. आसिफाबाद ( तेलंगणा) अशी सांगितली सदर वाहनाच्या मागुन येणारे 4 पिक अप चालकांनी समोर पोलीस आहेत हे पाहून त्यांची वाहने पलटवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला.
असता आम्ही पोलिस वाहनाच्या मदतीने त्यांचा पाठलाग केला असता वडोली नदीच्या पुलाजवळ त्यांनी वाहने थांबवून शेत शिवारामध्ये पळून गेले, त्यांचा पोलीस स्टाफच्या मदतीने पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाहीत मिळून आलेल्या 5 पिक अप वाहनांमध्ये 9,20,000/- रुपये किमतीचे एकूण 46 गोवंशिय गाय व बैल तसेच 410,0000/- रुपये किमतीचे 5 पिक अप वाहने असा एकूण 50,20,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल श्री सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस हवालदार विलास कोवे, वंदिराम पाल, अनुप कवठेकर, पोलीस अंमलदार अतुल तोडासे, तिरुपती गोडसेलवार, प्रवीण कडूकर, प्रशांत नैताम, सुनील गव्हारे चालक पुनेश्वर कुळमेथे, मनिषा ठाकरे, सैनिक रियाज शेख, प्रशांत गुडपल्ले यांनी केली आहे. 
























