Home
Home Breaking News विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.

0
237

HELLO CHANDA NEWS

 

          बल्लारपूर,(वि. प्र.) : शहरातील डॉ.आंबेडकर वॉर्डातील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता उघडकीस आली. श्रावणी सूरज केशकर (२९) असे मृत महिलेचे नाव आहे.

  डॉ. आंबेडकर वॉर्डातील श्रावणी व सूरज यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पती-पत्नीने एकत्रच चहा घेतला. त्यानंतर पती सूरज हा कामानिमित्त घराबाहेर गेला.

   सकाळी ११ च्या सुमारास सूरजचा पुतण्या घरी गेला असता वहिनी श्रावणी केशकर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. दुसऱ्या खोलीत पाच वर्षांचा मुलगा खेळत होता. हे धक्कादायक दृश्य पाहून पुतण्याने काका सूरज केशकर यांना माहिती दिली.

 पोलिसांना कळविल्यानंतर लगेच घरी पथक दाखल झाले. पंचनामा करून मृतदेहे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

विशेष, प्रतिनिधी, विनोद दुर्गे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here