Home
Home चंद्रपूर आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राणी हिराईंचा जन्मोत्सव चंद्रपुरात शासकीय स्तरावर होणार...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राणी हिराईंचा जन्मोत्सव चंद्रपुरात शासकीय स्तरावर होणार साजरा. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश. चंद्रपूर येथे २० एप्रिलला राजमाता राणी हिराईजन्मोत्सव; संस्कृती-कला आणि परंपरेचा उत्सव. आ.मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री यांना पत्र लिहून केली होती मागणी.

0
276

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(का. प्र.) – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर शहराच्या इतिहासात अढळ स्थान असलेल्या आणि गोंडवानाच्या ‘शेरनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता राणी हिराई यांचा जन्मोत्सव आता चंद्रपुरात शासकीय स्तरावर अत्यंत दिमाखात साजरा होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री. आशिष  शेलार यांना पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली होती.

 त्यांच्या पत्राची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभागाकडून २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

     राजमाता राणी हिराई यांच्या दूरदृष्टीपूर्ण कारभारामुळे चंद्रपूर शहराला वैभवशाली ओळख प्राप्त झाली. माता महाकाली मंदिर, राजा बिरशहा यांची समाधी अशा ऐतिहासिक वास्तू उभारून त्यांनी शहराच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला समृद्ध केले.

     या दैदिप्यमान इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि चंद्रपूरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, या हेतूने राजमाता राणी हिराई बहुउद्देशीय सेवा समिती, चांदागडचे अध्यक्ष. शांताराम उईके यांनी यासंदर्भात निधीची मागणी केली होती.

  या मागणीची दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री. आशिष शेलार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे निधीची मागणी केली.

 त्यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत राज्य शासनाने १२ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय काढून राजमाता राणी हिराई जन्मोत्सवासाठी निधी मंजूर केला आहे.

        हा निर्णय चंद्रपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, यामुळे राजमाता राणी हिराई यांच्या गौरवशाली कार्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.

                       असा होणार महोत्सव
 २० एप्रिल २०२६ रोजी चंद्रपूर येथील कोहिनूर तलाव, सोमेश्वर मंदिराजवळ हा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संगीत, वादन आणि नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच वन उत्पादन आणि हस्तकला प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात येणार आहे.

             आ. मुनगंटीवार यांच्या या प्रयत्नांमुळे गोंडकालीन संस्कृतीला आणि स्थानिक कलाकारांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here