HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का. प्र.):,चंद्रपूर येथील पठाणपुरा वॉर्डमध्ये राहणारे प्रशांत एकनाथ हजबन यांनी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अशी तोंडी रिपोर्ट दिली आहे की, माझा मोठा मूलगा गौरिश उर्फ प्रेम प्रशांत हजबन वय 17 वर्ष 7 महीने 24 दिवस (जन्म ता. 21/07/2008) हा जनता काँलेज चंद्रपूर येथे शिकत आहे. व तो माझे घरी राहतो परंतु आज 14/03/26 चे सकाळी 10/30 वा. मी शाळेसाठी घरून निघालो तेव्हा माझा मूलगा घरी बसून होता. अंदाजे 11/30 वा. माझा मोठा मूलगा गौरिश उर्फ प्रेम घरी दिसत नाही अशी माहिती मिळाली मी स्वतः आजूबाजूला त्याचा शोध घेतला तसेच मूलाचे मित्र, नातेवाईक, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप संपूर्ण चंद्रपूर परिसर येथे शोध घेतला असता गौरिश मिळून आला नाही.
कोणीतरी अज्ञात आरोपीनी फूस लावून माझा मूलगा गौरिश प्रशांत हजबन वय 17 वर्ष 7 महीने 24 दिवस रा. पठानपूरा वार्ड चंद्रपूर यास पळवून नेले असावे. अशी तक्रार केली असून मूलाचे वर्णन खालीलीप्रमाणे आहे.
वर्णन – रंग सावळा उंची 5 फूट 6 इंच बांधा मजबूत अंगावर कपडे- पोपटी रंगाची फूल टी शर्ट काळा रंगाचा जिन्स पॅन्ट, उजव्या भूवयाचे खाली तिळ, केस साधे अशा वर्णनाचा मूलाचा शोध घेण्यास पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे तक्रार दिली असून पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे प्रथम खबर क्रमांक 0364 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकचा तपास चंद्रपूर
शहर पोलिस करीत आहे.
























