Home
Home चंद्रपूर आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे यश.

आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे यश.

0
97

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(का. प्र.) : भारतीय स्त्री शक्ती, चंद्रपूर तर्फे स्व. सौ. कुसुमताई भुसारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

   या स्पर्धेचा विषय ‘सक्तीच्या लष्करी शिक्षणाची आवश्यकता’ हा होता.

   त्यात  सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

मराठी विभागातर्फे महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांचे निबंध पाठवण्यात आले होते.

      त्यात बी. ए. प्रथम वर्षातील मराठी विद्यार्थिनी कु.श्रुती निकेश गुरनुले हिने उत्कृष्ट निबंध लेखन करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

त्यात प्रमाणपत्र, पुस्तक व रोख रक्कम प्राप्त झाले.

     तिच्या या यशाबद्दल सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. एम. काटकर यांच्या हस्ते तसेच मराठी विभागातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.

    आणि भविष्यातही ती अशाच प्रकारे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. पी. एम. काटकर , मराठी विभागप्रमुख,डॉ पद्मरेखा धनकर, प्रा. सोहन कोल्हे , डॉ.धनराज मुरकुटे, प्रा.विवेकानंद पवार, प्रा.श्वेता चंदनकर प्रा.वैशाली पंडित आणि संपूर्ण मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here