===============================
मनसेचा सवाल, राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्या 200 पेक्षा जास्त मद्य विक्रेत्यांना परवाने दिले ते रद्द करण्याची मागणी. ================================ चंद्रपूर :- ================================ लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर अधीक्षक संजय पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी 200 पेक्षा जास्त बेकायदेशीर मद्य परवाने दिल्याने व दरमहा कोट्यावधी रुपयाची मद्य विक्रेत्याकडून वसुली केली जातं असल्याने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून या सर्वावर गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी स्थानिक प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे, यावेळी मनसे रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश कालबांधे, वर्षा भोंमले, पियुष धुपे, राज वर्मा, किशोर धोटे इत्यादीची उपस्थिती होती. ============================= गोदावरी बियर बार अँड रेस्टॉरंट घुग्गुस मध्ये बियर शॉपी’ सुरू करण्यासाठी परवाना देण्याच्या प्रकरणी लाच घेतांना दुय्यम निरीक्षक खरोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना रांगेहात पकडण्यात आले होते, दरम्यान या प्रकरणात एक लाख रुपयाची लाच घेण्यासाठी अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले असल्याने त्यांना सुद्धा अटक झाली होती. या प्रकरणात संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक खरोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना निलंबित करण्यात आले होते, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील आणि इतर सर्व अधिकारी यांनी 200 पेक्षा जास्त मद्य परवाने हे बेकायदेशीर पणे दिले असून त्यापोटी त्यांनी कोट्यावधी रुपयाची माया जमवली आहे, इतकेच नव्हे तर दरमहा 700 च्या वर मद्य विक्रेत्याकडून 5 ते 25 हजार रुपयाची ह्याप्रमाणे जवळपास एक कोटीच्या वर या विभागातील दुय्यम निरीक्षक, निरीक्षक व इतर कर्मचारी वसुली करतं आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील या भ्रष्टाचारची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली होती, मात्र जवळपास दोन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर सुद्धा संजय पाटील यांच्यासह त्यांच्या अधीनस्त अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी करण्यात आली नाही. ============================== या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबतच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार सुधाकर अडबाले यांनी सुद्धा या प्रकरणी एसआयटी चोकशीची मागणी केली आहे. पालकमंत्री व आमदार यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते असे सांगण्यात आले, परंतु एसआयटी चौकशी सुरू झाली नाही, दरम्यान कोल्हापूर येथील निवासस्थानाची एसीबी पथकांनी तपासणी केली असता तिथे सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, महागड्या चारचाकी गाड्या, जमिनीची कागदपत्रे मिळाली आहेत. पाटील यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती आहे हे स्पष्ट होतं आहे आणि ही संपत्ती बेकायदेशीर मद्य परवाने व महिन्याकाठी कोट्यावधीची वसुली यातून त्यांनी मिळवली आहे, यामध्ये निरीक्षक पवार व थोरात सुद्धा सहभागी आहे कारण त्यांनीच मद्य परवाने मंजूर करण्यासाठी खोटा व बनावट अहवाल सादर केल्याने 200 पेक्षा जास्त मद्य दुकाने बेकायदेशीर देण्यात आले आहे. ================================ संजय पाटील यांनी गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यात ७५० पेक्षा अधिक बियर बार अँड रेस्टॉरंट, ९ वाईन शॉप, देशी दारू दुकान, बियर शॉपीला परवानगी दिली आहे व या परवाना मंजुरीतून ६४ कोटी पेक्षा अधिकची रक्कम त्यांनी निरीक्षक पवार, थोरात, दुय्यम निरीक्षक खरोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्या माध्यमातून जमा केली यात या सर्वांचा सहभाग असल्याने या सर्वांची चालू पावसाळी अधिवेशनात एसआयटी चौकशीची घोषणा करून ते 200 बेकायदेशीर परवाने रद्द करून दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा शासन प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेन असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे ============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,