Home
Home चंद्रपूर *शेतकरी, युवक, महिला व राष्ट्रोत्थानास समर्पित अर्थसंकल्प – हंसराज अहीर*

*शेतकरी, युवक, महिला व राष्ट्रोत्थानास समर्पित अर्थसंकल्प – हंसराज अहीर*

0
72

=================================         *शेतकरी, युवक, महिला व राष्ट्रोत्थानास समर्पित अर्थसंकल्प – हंसराज अहीर* =============================             चंद्रपूर / यवतमाळ :- विकसित भारत घडविण्याचे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या भक्कम जडणघडणीस तसेच गरीब, शेतकरी, युवा व महिला उत्थानास नवी दिशा देणारा असून हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यास साह्यभुत ठरणारा असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.        ================================           या अर्थसंकल्पातून रोजगार, कौशल्य विकास लघु व सुक्ष्म उद्योगास चालना, मध्यम वर्गास न्याय, कृषी उत्पादन वृध्दी, कृषी संशोधन व अन्य क्षेत्राशी निगडीत रचनात्मक विकासाला वाव देण्याचा कसोशिने प्रयत्न करण्यात आला आहे. शेतीसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करुन सरकारने कृषीक्षेत्रात अनेक महत्वकांक्षी योजनांना पुरस्कृत करण्याचा व्यापक प्रयत्न केला आहे. नवरोजगारासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतुद करीत महिला उत्थानास गती देण्याची भुमिका आहे. पी-एम सुर्यघर योजनेंतर्गत एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज कर्मचारी पेन्शनधारकांना कर प्रस्तावात सवलत, शिक्षण, स्वास्थ्य, ग्रामीण विकासावर अर्थसंकल्पातून भर दिला आहे.    ===============================               हा अर्थसंकल्प सर्वसमावेशी असल्याने सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केला असून हा अर्थसंकल्प विकसित भारताचा रोडमॅप असल्याची प्रतिक्रीया हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.    ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*        ================================               कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here