सप्रेम जयहिंद….
आपली परम पवित्र भारत माता स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. या क्षणाचे आपण सारेच साक्षीदार आहोत हे विशेष. हा सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा क्षण आहे. हे स्वातंत्र्य आज आपल्याला उपभोगता येत असले तरी ते अपार कष्टाने मिळाले आहे हे मात्र विसरून चालणार नाही. एकीकडे अहिंसेच्या मार्गाने जात महात्मा गांधींच्या नेतृत्वात हा देश लढत असताना. असंख्य क्रांतिकारक सुद्धा आपल्या प्राणांची आहुति देत होते. भगतसिंग, राजगुरू, अल्लूरि सीताराम राजू, राणी चनमा, सरदार उधम सिंग, राणी गायदीनगलू , डॉ खानखोजे, पुलेश्वर बाबुराव शेडमाके,बिरसा मुंडा, रामसिंह कुका या अनाम वीरांना देश विसरला. किती किती लोकांनी आपल्या प्राणांची आहुति दिली. तेंव्हा कुठे आजचे स्वातंत्र्य आपल्याला दिसत आहे. खडग बिना ढाल हे स्वातंत्र्य. मिळालेले नाही. त्यासाठी अनेकांचे रक्त सांडले आहे,. कित्येक महिलांचे जोहर झाले आहेत. मित्रांनो देश आज वेगाने पुढे जातोय. जग आपल्याकडे आशेने बघत आहे. स्वामी विवेकानंद आणि योगी अरविन्द म्हणाले होते, २१ वे शतक हे भारताचे असेल. आम्ही अमृताचे पुत्र आहोत. शतकानुशतके परकीय शत्रूशी लढून आपण आपला देश टिकवला आहे.
या पवित्र राष्ट्रीय पर्वाचे औचित्य साधून आमदार मूनगंटीवार यांच्या नेतृत्वात बलारपूर विधानसभा मतदार संघात मूल आणि पोंभूर्णा तालुक्यात ७५ फुट उंचीचा भव्य तिरंगा लावण्यात येत आहे. आपल्या अभिमानाचे प्रतीक असलेला तिरंगा डौलाने फडकणार आहे.• तिरंगा ३ बाय २ या आकारात असावा.
• प्लॅस्टिक चा झेंडा लावू नये.
• तिरंगा लावताना तो तिरपा किंवा आडवा लावू नये.
• १५ ऑगस्ट ला तिरंगा उतरविल्यावर तो इकडे तिकडे पडायला नको.
• तो योग्य जागी घडी करून ठेवावा.
• तिरंगा खाली पडणार नही याची काळजी घ्यावी.

संपादक महोदय .. आपल्या दैनिकात ही बातमी प्रकाशित करावी ही विनंती….
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793