==============================
*शहरात मच्छर किट नाषक फवारणी सुरू.* =================================
दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती च्या वतीने शहरात मच्छर किट नाषक फवारणी सुरू करण्या बाबत नगर परिषद भद्रावती येथे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल नगर परिषद भद्रावती द्वारा घेन्यात आले असून शहरात मच्छर किट नाषक फवारणी सुरू करण्यात आले आहे. सतत भद्रावती शहरात डेंग्यू चा प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते व शहरात प्रत्येक दुसऱ्या घरी डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड चा रुग्ण आढळत आहे. परंतु नगर परिषद भद्रावती द्वारे मच्छर किट नाषक फवारणी सुरू करण्यात आली नाही. हे सगळे विषय लक्षात घेत आम आदमी पार्टी भद्रावती च्या वतीने या संबंधित नगर परिषद भद्रावती येथे मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले व निवेदना द्वारे मागणी करण्यात आले की, 1. प्रत्येक वार्डांत हफ्त्यातून दोन वेळा मच्छर किट नाषक फवारणी करा. 2. शहरात डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया सारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रचार प्रसार च्या माध्यमातून जनजागृती आणावी. 3. सरकारी नळ द्वारे घरो घरी पाणीपुरवठा होत असून ते पाणी पिण्या योग्य आहे का यावर लक्ष केंद्रित करावे. या सगळ्या मागण्या विषयी आज नगर परिषद भद्रावती द्वारा मच्छर किट नाषक फवारणी शहरात सुरू करण्यात आले असून आम आदमी पार्टी ने नगर परिषद भद्रावती चे आभार व्यक्त केले. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,