Home
Home Breaking News *चंद्रपुर जिल्हात अवैध धंद्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक...

*चंद्रपुर जिल्हात अवैध धंद्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन साहेब, चंद्रपुर यांनी दिल्या अंतर्गत गोवंशने भरलेला ट्रक आरोपींसह जप्त*

0
98

=============================

त्या अनुषंगाने आज तारीख 19/08/2024 रोजी रात्री 23:56 वाजता गोपनीय माहीतीच्या आधारे एक ट्रक अवैध गोवंशीय जनावरे कृरतेने वाहनात भरून वाहतुक करीत असल्याचे खबरेवरून सावली पो.स्टे. तील डिव्हीजन गस्त व रात्रगस्त अधि. व अंमलदार यांनी पोस्टे सावली समोरील हॉयवे रोडवर छापा कारवाईसाठी नाकेबंदी करून नाकेबंदी दरम्याण जप्त ट्रक क. TS- 02, UB-7671 ची पाहनी केली असता त्यामध्ये 42 नग गोवंशीय जनावरे किंमत. 4,20,000/- रुपये व नमुद वाहन किमंत. 10,00,000/- रुपये असा एकुन 14,20,000/- रुपयेचा माल मिळुन आल्याने आरोपी क. 1) युनुस करिम शेख, वय 27 वर्ष, रा मरकागोंदी, ता जिवती, जि चंद्रपुर 2) खदीर चोंद शेख, वय 30 वर्ष, रा बालाजी नगर जैनुर, ता जैनुर, जि असासिफाबाद, 3) फरार आरोपी आशिफ बाबुपटेल सय्यद, रा गोयेगाव, ता वाकडी, जि आसिफाबाद, 4) फरार आरोपी सादीक खान, रा गडचांदूर यांचे विरूध्द महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनीयम 1976, प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनीयम 1960, महाराष्ट्र पोलीस अधिनीयग 1951 व मोटार वाहन अधिनीयम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. =================================== सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भगत साहेब, मुल यांचे मार्गदर्शना खाली सपोनि, जिवन राजगुरु यांनी केली।        ===================================      *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  =================================        कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here