===============================
*चंद्रपूर* =================≠=============
बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज, शुक्रवारी चंद्रपूर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी शहरातून निघालेल्या मोर्चाचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शीतपेय आणि पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले.
सकाळी गांधी चौकातून सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली. सदर मोर्चा शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात आमदार किशोर जोरगेवार सहभागी झाले होते. सदर मोर्चाचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौकात स्वागत मंच तयार करण्यात आला होता. मोर्चा स्वागतमंचाजवळ पोहोचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे स्वागत करत शीतपेयाचे वाटप केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























