Home
Home Breaking News *महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची साखळी काही केल्या थांबेना, आता चंद्रपुरातील नागभीड़ येथे मनो...

*महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची साखळी काही केल्या थांबेना, आता चंद्रपुरातील नागभीड़ येथे मनो रुग्ण महिलेवर अत्याचार करुण क्लिप वायरल*

0
83

===============================

*नागभीड*   

===============================

नागभीड(ता.प्र.): आज दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी १०:०० वाजता सुमारास पोलीस स्टेशन नागभीड हद्‌दीत सोशल मिडीया व्हॉटस ऐप वर आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याचे माहिती मिळताच नागभीड पोलीसांनी तात्काळ दखल घेवुन व्हिडीओ मधील पिडीत महिलेचा शोध घेत तिची ओळख पटविण्यात आली.

सदर व्हिडिओ मधील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पोलीस पथके तयार करुन आरोपीतांचा शोध घेतला असता सदर गुन्हयात सामील सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगुन सदर व्हिडीओचे घटनास्थळ नागभीड बस स्थानकातील मुत्रीघर मधील असुन दिनांक १२/०८/२०२४ च्या मध्यरात्री दरम्यान पिडीत/मनोरुग्ण महिलेस एकटी असल्याचे पाहुन तिला मुत्रीघरात नेवून तिचे सोबत एका आरोपीने बळजबरीने अतिप्रसंग केला त्यावेळी त्याच्यातील दुसऱ्या आरोपीने मोबाईलवर त्याचे व्हिडीओ काढले असुन इतर आरोपींनी गुन्हा करण्यास सहकार्य केले.
सदर आक्षेपार्ह व्हिडीओ त्यातील एका आरोपीने त्याचे एका मित्राला व्हॉट्स ॲप वर पाठविले असता त्याने सदर व्हिडीओ वेगवेगळे लोकांना व्हॉटस ॲप पाठवुन सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असून सदर आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन नागभीड येथे अपराध क्रमांक २६२/२०२४ कलम ६४ (२) (क), ७० (१), ८७, १२६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ६७. ६७ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी तात्काळ भेट देवून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन मनोरुग्ण महिलेस तातडीने औषधोपचारासाठी पाठविण्यात आले. असुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघडकीस आणुन पिडीता व आरोपीतांची ओळख पटविण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स.पो.नि. दिलीप पोटभरे,पो.उप.नि. अनुराधा फुकट पो.स्टे. नागभीड, पोलीस निरीक्षक विजय राठोड, पो.स्टे. सिंदेवाही, स.पो.नि. अजीतसिंग देवरे, पो.स्टे. तळोधी, स.पो.नि. प्राची राजुरकर, स.पो.नि. राजकिरण मडावी पो.स्टे. ब्रम्हपुरी तसेच गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. विनोद भुरले, पो.उप.नि.रोशन इरपाचे व स्टॉफ तसेच सायबर व एक्सपर्टची टिम यांनी सदर गुन्हा काही तासाचे आंत उपडकीस आणुन मोलाची कामगिरी बजावली आहे,हे मात्र विशेष!
चंद्रपूर पोलीसांद्वारे आवाहन करण्यात येते की, सदर घटने संदर्भाचे कोणतेही व्हिडीओ समाज माध्यमावर पाठवु नये किंवा कोणतीही अफवा पसरवू नये जेणे करून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे कृत्य केल्यास संबंधीतांविरुष्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे ही बजावून सांगण्यात आले आहे.

==============================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     =================================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here