===============================
आज दिनांक ३१/०८/२०२४ रोज शनिवारला प्रबोधन माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय आरवट येथे,प्राचार्य देरकर सर यांचे अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अतिथी म्हणून सुलभाताई भोंगरे सरपंच ग्राम पंचायत आरवट.प्रमुख मार्गदर्शक श्री.साखरकर सहेब जील्हा बालसंरक्षण अधिकारी,श्री. दराडे साहेब पी.एस. आय.शहर पोलिस स्टेशन चंद्रपूर,श्री.मोकासे साहेब क्षत्रिय अधिकारी चंद्रपूर.शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दराडे साहेब यांनी विद्यार्थ्याना पोस्को कायद्याची माहिती देऊन जागृती केली. साखरकर साहेब तसेच मोकासे साहेब यांनी गुड तच, बॅड टच शरीरातील संवेदनशील ठिकाणाला कुणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि तो स्पर्श असाहाय्य किंवा वाईट वाटला याला प्रतिकार करण्यासाठी से नो किंवा ओरडणे, आई वडील शिक्षक मुख्याध्यापक यापैकी कोणालाही सूचना करतो म्हणून बोलत आपली प्रथम सुटका करणे बद्दल माहिती प्रत्यक्षिका द्वारे दिली. सोबत बाल विवाह त्यापासून होणारे दुष्परिणाम, अल्पवयी असल्याने जीवनात येणारे बदल, शिक्षणात होणारा परिणाम, बालविवाहाच्या कायद्यात असलेल्या शिक्षेच्या तरतुदी ,लैंगिक छळ, बाल अत्याचार, बालकांच्या योजनांबद्दल सखोल मार्गदर्शन केले.मोबाईलचा वापर कसा करावा, किती वर्षापासून तर किती वर्षापर्यंतच्या लेकरांना मोबाईलचा वापर करण्यात प्रतिबंध केला पाहिजे, वापरायचा तर मग किती वेळ, याचे होणारे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारा परिणाम, स्क्रीन ॲडिक्शन नंतरची परिस्थिती याबाबत जागृती केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कंनोजवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार राजूरकर यांनी मानले.कर्मक्रामाचे सूत्र संचालन श्री. लांबाडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे, संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356, उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,