*वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या*

0
15

===================================

*चंद्रपूर*                                  ================================              , (दि.12):- चंद्रपूर शहरातील नामवंतअसलेल्या इन्स्पार कोचिंग क्लासेस मध्ये NEET परीक्षेची तयारी करण्याकरीता आलेल्या वसतिगृहातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. प्रांजली राजूरकर असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून वसतिगृहाचा शिकवणी वर्गातच प्रांजलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.   

दरम्यान आत्महत्येचे कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही. प्रांजली ही यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील रहिवासी आहे. बारावीनंतर तिने उच्च शिक्षण घेण्यासाठी चंद्रपूर शहरातील इन्स्पायर कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. प्रांजली NEET परीक्षेची तयारी करत होती.
संस्थेच्या वसतिगृहातच ती राहत होती. बुधवारी सायंकाळच्या सुमारास खोलीत एकटी असतानाच तिने गळफास घेत आत्महत्या केली पुढील तपास चंद्रपूर पोलिस करीत आहे,    ==================================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ===============================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here