*_वाकडी या परिसरात रानटी हतीचा कळप आल्याने मा.खा.अशोकजी नेते‌ यांनी वाकडी ग्रामपंचायत मध्ये घेतला गावाचा आढावा…._*

0
15

===============================

दिं.३० सप्टेंबर २०२४

गडचिरोली पासून अवघ्या जवळील परिसरातील सेमाना वाकडी या गावाच्या परिसरात रानटी हतीचा झुंड आल्याने गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याने हतीमुळे दहशत निर्माण झाली असून यात जीवितहानी होऊन संकट नाकारता येत नाही. यासाठी मा.खा.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी आज दिं.३० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय वाकडी येथे आढावा घेत ग्रामस्थांशी चर्चा करत हतीचा बंदोबस्त कसा केला जाईल यावर विचार मंथन करत येथून हतीचा झुंड हाकलुन लावावे असे ग्रामस्थांनातून जमलेल्या नागरिकांमधून सुर येत होता.                                                                 
या संबंधित माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी यावर ग्रामस्थांनशी चर्चा करत नागरिक जनतेनी आपली काळजी घेऊन एकांतात न जाता कुठेही बाहेर जायचं असल्यास दोघे तिघे जावे असे सांगत सतर्कता बाळगावी लागेल याबरोबरच वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी मान.रमेश कुमार साहेब यांच्याशी दुरध्वनी द्वारे संवाद साधत तातडीने हाकलून लावण्याचे निर्देश मा.खा. नेते यांनी यावेळी केले.                 

यावेळी प्रामुख्याने तालुका महामंत्री बंडूजी झाडे,भाजपाचे जेष्ठ नेते यशवंतजी झरकर,जेष्ठ ‌नेते देविदासभाऊ नागरे, चरणदास पा.बोरकुटे,दिवाकरजी चौधरी , देवरावजी पाल तसेच मोठ्या संख्येने गावातील महिला नागरिक बंधुभगिनी उपस्थित होते.         ===============================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===============================                कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here