*तीन वर्षांपासून प्रलंबित गोवरी सेंट्रल परियोजना ला सीबी ॲक्ट सेक्शन ४ ची अधिसूचना जारी.*

0
34

==================================

*माननीय हंसराजजी अहीर राष्ट्रीय ओबिसीआयोग भारत सरकार यांच्या प्रयत्नाने चार गावातील शेतकऱ्यांना दिलासा*

चंद्रपूरः- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकाराने अखेर वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतील गत 3 वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या गोवरी सेंट्रल परियोजनेकरीता सीबी ॲक्ट  सेक्शन 4 ची अधिसुचना कोल मंत्रालयातून  जारी  झालेली आहे.                                                                 
या प्रलंबित परियोजनेला पी.आर.मंजुरीपासून  कॉस्ट प्लस खरेदीदार करारनामा करणेसह सेक्शन ४ साठी प्रस्तावित करणे पासून या बाबत अधिसूचना जाहीर होईपर्यंत प्रकल्पग्रस्तानी भाजपा किसान आघाडीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजू घरोटे व अॅड. इंजि .प्रशांत घरोटे यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त ज्ञानेश्वर पिंपळकर, महादेव हिंगाने, अखिलेश लोनगाडगे, भुपेश जुनघरी, योगेश खोके, संजय उईके, पवन उईके, विठ्ठल भोयर, संतोष उईके, केतन खोके यांचेसह अनेक प्रकल्पग्रस्तांनी हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून गोवरी सेंट्रल परियोजनेच्या कार्यान्वयनातील अडसर दूर करण्याची मागणी केली होती.                           
या मागणीची गंभीरपणे दखल घेवून या प्रकल्पातील बहुसंख्य ओबीसी शेतकरी व इतरांना न्याय मिळण्याकरीता ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी याप्रश्नी दि. 28 जून 2023 रोजी यापूर्वी आणि नंतर देखील वेकोलिचे चेअरमन कोल इंडिया, सीएमडी, वरिष्ठ अधिकारी, बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांच्या संयुक्त बैठकीत सुनावणी घेवून गोवरी सेंट्रल परियोजनेच्या कार्यान्वयनातील अडसर दूर करण्याचे निर्देश दिले होते. रवीभवन नागपूर येथे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे मार्च 2024 रोजी घेतलेल्या एनसीबीसीच्या सुनावणीत व यापूर्वी वेकोलि मुख्यालय नागपूर येथे झालेल्या बैठकीत या प्रकरणी तातडीने कार्यवाहीचे निर्देश जारी केले होते.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या निर्देशानुसार वेकोलि नागपूर मुख्यालयाने कोल इंडियाद्वारा गोवरी सेंट्रल परियोजने संदर्भातील प्रकल्प अहवाल (पीआर) मंजूर करवून घेत कोळसा खरेदी करीता दि. 06 जून 2024 रोजी एनटीपीसी व वेकोलि दरम्यान कॉस्ट प्लस व खरेदीदार करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारामुळे आता गोवरी सेंट्रल परियोजनेच्या कार्यान्वयनात विशेष अडसर  राहिला नसून लवकरच कोल बेअरींग एक्ट 1957 नुसार भूमि अधिग्रहणाकरीता सेक्शन 7 ची अधिसुचना जारी करण्याकरिता क्षेत्रीय कार्यालयाव्दारे मंत्रालयीन स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे वेकोलिच्या उदासिनतेमुळे मागील 3 वर्षापासून थंडबस्त्यात पडलेला गोवरी सेंट्रलचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या उपलब्धीमुळे प्रकल्पप्रभावित चिंचोली, गोवरी, गोयेगांव, अंतरगांव, येथील शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हंसराज अहीर यांचे व वेकोलि मुख्यालयाचे अभिनंदन करून विशेष आभार मानले*     ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==================================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here