*परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक डॉ. दोनाडकर यांनी खेमराज भाऊ नेवारे यांना सांगितली गेल्या 30 वर्षापासून होत असलेली पिळवणूक.*

0
22

================================

*परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक डॉ. दोनाडकर यांनी खेमराज भाऊ नेवारे यांना सांगितली गेल्या 30 वर्षापासून होत असलेली पिळवणूक.*  ================================
देसाईगंज तालुक्यात अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेले किन्हाळा, मोहटोला व अरततोंडी हे गांव 1993 ला पुनर्वसित केले गेले.किन्हाळा हे गांव आदर्श गांव म्हणून पुरस्कृत आहे. या गावात सर्वच पक्षांचे राजकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात. परंतु स्वार्थी राजकीय संघर्षामुळे गांव अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. 30 वर्षांपासून कोणत्याच प्रतिनिधीला गावाच्या विकासात रस दिसत नाही मग ते ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य किंवा ग्रामसेवक असो यांना कुणालाही देणेघेणे नाही. अशी खोचक टीका परमात्मा एक सेवक मार्गदर्शक तथा परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्था, गडचिरोली यांचे प्रणेते डॉ.गोविंदराव सीतारामजी दोनाडकर,रा.किन्हाळा यांनी सामाजिक कार्यकर्ते खेमराज भाऊ नेवारे यांच्याकडे व्यक्त केली.
त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता अनेक गुप्त बाबींचा उलगडा झाला.त्यांचा भाग अजूनही विकासाची वाट पाहत आहे. आदिवासीचा जिल्हा असून आदिवासी लोकांसाठी मूलभूत सोयी सुविधा नाही. रस्त्याची दुरावस्था झाली आहे.रस्त्यावर मोठ मोठे दगड आहेत त्यामुळे बालकांनी चालावे कसे?असा सवाल उपस्थित होतो. सार्वजनिक विहीर अनेक वर्षांपासून कोरडी पडली आहे.नळ योजना केवळ नावापुरतीच उरली आहे नियमित पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे नागरिकांना 12 ही महिने पाण्याची अडचण भासते.नालीचे बांधकाम न केल्यामुळे संपूर्ण पावसाळभर रस्त्यावर 2 ते 3 फुटाच्या वर पाणी साचून राहते. मोकळ्या जागेत झूडुपी जंगल तयार झाले आहे त्यामुळे नागरिकांना साप विंचू यांचा धोका कायम राहतो अशा अनेक अडचणी आहेत.
तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या भागात सिमेंट चे रस्ते तयार करणे, नाली चे बांधकाम करणे, पाण्याची सुविधा उपलब्ध करणे तसेच मोकळ्या जागेची साफसफाई करणे या प्रश्नांना प्राथमिकता देऊन शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अन्यथा खेमराज भाऊ नेवारे व परमात्मा एक मार्गदर्शक डॉ. दोनाडकर यांच्या पाठिंब्याने किन्हाळा व अरततोंडी येथील नागरिकांसोबत मिळून नक्कीच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील यात तिळमात्र शंका नाही.       ==================================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==================================        कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here