*शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके शहीद स्मारक स्थळी व बिनबा गेट वर *हंसराज अहीर यांचे हस्ते ध्वजारोहण.*

0
40

भारतीय स्वातंत्र्याच्या *अमृत महोत्सवी “स्वातंत्र्यदिनाच्या”* पर्वावर *स्वातंत्र्ययोद्धा शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके* यांच्या जिल्हा कारागृह परिसरातील *शहीद स्थळावर* व *बिनबा गेट* वर *पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर* यांच्या हस्ते *ध्वजारोहण* करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अहिर म्हणाले की, बलशाली भारत हि संकल्पना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात भारताला “विश्वगुरू” चा सन्मान देण्यासाठी देशवासीयांनी ऐक्य व एकजुटीचा परिचय देऊन देशाला उत्तुंग उंचीवर नेण्यासाठी राष्ट्रभक्तीचा जागर मनामनात तेवत ठेवण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीद बाबुराव शेडमाके, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राम प्रसाद बिस्मिल आदि भारतीय सुपुत्रांपासून प्रेरणा घेऊन राष्ट्र सेवा व समर्पणाचा सर्वानी अंगीकार करावा असे आवाहन केले. या आनंददायी दिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोट बुक्स व मिठाई वाटप करण्यात आली. स्थानीक बिनबा गेट वर हि अहीर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व विद्यार्थ्यांना नोट बुक्स वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, महानगर ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी, अनुसूचित जमाती आघाडी महानगर अध्यक्ष धनराज कोवे, ओबीसी महिला आघाडी महानगर जिल्हा संयोजक वंदना संतोषवार, भटक्या विमुक्त जाती महानगर अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, गणेश गेडाम, मोहन चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, मायाताई उईके, प्रदीप किरमे, ज्योतीताई गेडाम, चंद्रकलाताई सोयाम, शीतल आत्राम, शीतल कुळमेथे, श्रीकांत भोयर, पूनम तिवारी, गौतम यादव, बाळू कोलनकर, अशोक सोनी, तुषार मोहुर्ले, चंद्रप्रकाश गौरकर, अरविंद मडावी, यशवंत सिडाम, कमलेश आत्राम, प्रकाश कुंभरे, विठ्ठल कुंभरे, अमर चांदेकर, प्रवीण चुनारकर, शालिनी वासमवार, रेखाताई मडावी, शिलाताई गेडाम, नीलिमाताई आत्राम, श्याम मडावी, अनिल सुरपाम, कमलेश आत्राम, सीमाताई मडावी, प्रीती दडमल, राखीताई कोवे, प्रीती आत्राम, मुग्धा खांडे, भारतीताई निकम, भूमिका मडावी, कार्तिक मडावी, श्रावण आत्राम, नितीन लसूंते, मेघाताई वर्गटीवार, निताताई पिंपळकर यांचेसह अन्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here