*अमली पदार्थ गांजा विकीकरणा-यावर चंद्रपुर शहर पोलीसांची धाड*

0
10

============================

*अमली पदार्थ गांजा विकीकरणा-यावर चंद्रपुर शहर पोलीसांची धाड*

दि. १३/१०/२०२४ रोजी चंद्रपुर शहर पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, बि.जी. हनुमान चौक घुटकाळा वार्ड चंदपुर येथे शारीक कुरेशी रा. रहमतनगर वार्ड चंद्रपुर व मोबीन शेख रा. दर्गा वार्ड चंद्रपुर हे आपल्या जवळ मनोव्यापारावर परीनाम करणारे अमली पदार्थ गांजा बाळगुन विकी करीत आहे. तेव्हा शासकीय पंच, वजन मापारी, फोटोग्राफर व पोलीस स्टाफसह रेड केली असता घटनास्थळा वरून १) १.३८३ किलो ग्रॅम इतके वजनाचे निव्वळ गांजा किंमत १४,०००/- रूपये २) गांजा विकी करून मिळवलेले नगदी रक्कम १६००/- रूपये ३) दोन्ही आरोपीतांचे दोन मोबाईल फोन किंमत २०,०००/- रूपये अस एकुण ३५६००/- रूपयेचा माल मिळुण आल्याने सदरचा माल जप्त करून पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अपराध क. ७९५/२०२४ कलम ८ (क), २० (ब),२० (ii) (ब), २९ Ndps act 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री मुमंक्का सुदर्शण सा. मा. अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके सा. यांचे नेतृत्वत खाली स.पो.नी. निलेश वाघमारे, मंगेश भोंगाडे, पोहवा सचीन बोरकर /२३००, संतोष कनकम/४२२, पोका ईम्रान खान/२५४२, रूपेश रणदीवे/११४४, दिलीप कुसराम / २५९९, राहुल चिताडे / २५४७, ईर्शाद खान/१६२ यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचे पुढील तपास पोउपनी संदीप बंच्छीरे पोस्टे चंद्रपुर शहर हे करीत आहे.

आरोपी नामे १) शरीक जलील कुरेशर वय ३६ वर्ष रा. रहमतनगर वार्ड चंद्रपुर २) मोबीन करीम शेख वय ३१ वर्ष रा. दर्गा वार्ड घुटकाळा वार्ड चंद्रपुर    =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here