================================
तुम्ही मला मतदान केले का असा प्रश्न विचारणारा तो आमदार कोण? =================================
चंद्रपूर(वि.प्र.): महाराष्ट्र विधानसभा च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या व त्याच्यात अनेक पक्षाचे आमदार निवडून आले चंद्रपूर जिल्ह्यातील या निवडणुकीत काँग्रेसचे एक तर भारतीय जनता पार्टीचे पाच आमदार निवडून आले असून निवडणुकीचे बिगुल शांत झाले असतानाही चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून आलेल्या एका आमदाराची चर्चा मात्र संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात गाजत आहे.
निवडणुकीपुरता पक्ष, अपक्ष या सर्व बाबीवर चर्चा करणे योग्य असते व प्रत्येक जण आपल्या मतदारसंघात आपापल्या निवडीच्या पसंतीच्या आमदाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असतातच परंतु निवडणूक संपल्यावर व निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्या विधानसभा क्षेत्रातील समस्त जनतेचे कार्य करणे विकास कामे करणे हेच आमदाराचे आद्य कर्तव्य असले पाहिजे परंतु चंद्रपूर जिल्ह्यात तसेच दिसत येत असून चंद्रपूर जिल्ह्यातील एका आमदाराकडून कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य माणसाला सुद्धा तुम्ही मला मतदान केले का असे प्रश्न स्पष्टपणे विचारले जात आहे हे कितपत योग्य आहे?
वास्तविक पाहता निवडणुकीच्या निकालानंतर आमदार हा त्यात विधानसभा क्षेत्राचा सर्वांचा असतो परंतु जनसामान्य लोकांकडून जेव्हा त्याच्याकडे आपल्याला उद्भवणाऱ्या समस्या बाबत सांगितले जाते किंवा समस्याची सोडवणूक करण्यासाठी मागणी केली जाते तर त्यांना थेट पणे हा आमदार विचारतो की तुम्ही मला निवडणुकीत मतदान केले का? जर मतदानास केले नसेल तर आले कसे? असा प्रश्न विचारतो असा प्रश्न एखाद्या आमदाराने विचारणे व जनतेचे समस्येचे निराकरण न करता त्यांना उलटपाई पाठवणे हे कितपत योग्य आहे हा प्रश्न सध्या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात गाजत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील हा आमदार सर्वांना जर असेच प्रश्न विचारात असेल तर खरोखरच आपले कर्तव्य योग्यपणे पार पाडू शकेल का सामान्य जनतेला न्याय देऊ शकेल काय हा प्रश्न जनसामान्याकडून उघडपणे विचारला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील हा आमदार जनसामान्य कार्यकर्ताचा मतदार राजाचा नाही का जे मतदार या विधानसभा वास्तव्यास आहे त्यांचे समस्याचे निराकरण करण्याचे त्यांचे कर्तव्य नाही का फक्त विशिष्ट व्यक्तीचे कार्य करण्यासाठी हे मान्यवर आमदार झालेत काय असा प्रश्न जनतेकडून केला जात आहे, हे मात्र विशेष!
तुम्ही मला मतदान केले का असा प्रश्न विचारणारा तो आमदार कोण? या प्रश्नाचे उत्तर
सध्यातरी जनतेकडून दबक्या आवाजात दिले जात आहे. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे *मुख्य संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356* *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*