Home
Home चंद्रपूर चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांचे स्वागत –...

चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांचे स्वागत – सत्कार!

0
157

===============================

चंद्रपूर(वि.प्र.) चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे मुख्य अभियंता म्हणून विजय राठोड नुकतेच रुजू झाले असून काही दिवसापूर्वी त्यांची खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रावरून चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रात बदली करण्यात आली आहे.

विजय राठोड यांनी खापरखेडा येथे उत्कृष्ट अशी सेवा दिली खापरखेडा येथील विद्युत केंद्राला अत्याधिक गतिमान केले. विजय राठोड हे अत्यंत गांभीर्याने आपले कर्तव्य पार पाडत असतात असे देखील म्हटले जाते. अधिकारी येतात आणि जातात पण काही अधिकारी असे असतात जे आपले नाव त्या स्थानावरून बदली झाल्यानंतरही लोकांच्या मनात कायम ठेवतात. विजय राठोड यांनी खापरखेडा येथील दोन वर्षाच्या कार्यकाळात या विद्युत केंद्राला अत्याधिक प्रगत केले व आपल्या नावाची त्यांनी विशेष छाप सोडली! मनमिळावू स्वभावाचे, निष्ठेने कर्तव्य पूर्ण करणारे विजय राठोड आपल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला लाभले असे देखील बोलले जात आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे नाव संपूर्ण देशात विख्यात आहे. विजय राठोड यांना एवढी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे म्हणजे त्यांना त्यांनी केलेल्या कार्याची पावती मिळाली असावी असे देखील बोलले जात आहे. विजय राठोड हे एक अनुभवी अभियंता असून आपल्या कामाच्या प्रती अत्यंत निष्ठावंत असल्याचे देखील बोलले जात आहे.

दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक तसेच कलम मांगे इन्साफ या पोर्टलचे संपादक/ मालक सय्यद रमजान अली यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांची भेट घेतली. सर्वप्रथम सय्यद रमजान अली यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार केले. याप्रसंगी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता भूषण शिंदे हे देखील उपस्थित होते.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या संदर्भात तिघांनी आपसात चर्चा केली तसेच पुढील भविष्यासाठी चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांना सय्यद रमजान अली यांनी शुभेच्छा देखील दिल्या! चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्राची जबाबदारी विजय राठोड हे यशस्वीपणे पार पाडतील अशी अपेक्षा देखील याप्रसंगी व्यक्त करण्यात आली, हे मात्र विशेष!   ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*        ===============================           

*हॅलो चांदा न्यूज,*
*मुख्य संपादक,*
*शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here