Home
Home चंद्रपूर *सावित्री बाई फुले उच्च प्राथमिक शाळा अष्टभुजा वॉर्ड चंद्रपूर येथे “बेटी बचाव...

*सावित्री बाई फुले उच्च प्राथमिक शाळा अष्टभुजा वॉर्ड चंद्रपूर येथे “बेटी बचाव बेटी पढाव” बालविवाह मुक्त, भारत अभियान*

0
81

=================================

*चंद्रपूर*     =============================

आज सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा अष्टभुजा वॉर्ड चंद्रपूर येथे “बेटी बचाव बेटी पढाव” बालविवाह मुक्त भारत, बालकांचे लैंगिक शोषण आणि बालकामगार यावर कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला शाळेच्या मुख्याध्यापीका पाजनकर मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.       या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मा ॲड क्षमा बासरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, असेस टु जस्टीस प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी श्री शशिकांत मोकाशे,   असेस टु जस्टिस प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक नरेश मॅकलवार प्रामुख्याने उपस्थित होते. बालकांच्या मार्गदर्शनानंतर “बेटी बचाव बेटी पढाव” या सप्ताहाच्या अंतर्गत जिल्ह्यातील पहिला कार्यक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभाग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सदर रॅलीचा उद्देश होता मुलींना शिक्षणाचा अधिकार शिकल्या तर प्रगती होईल बालविवाह थांबेल व तिच्या जीवनातही आर्थिक रूपाने स्थाईत्व प्राप्त होईल ज्यामुळे देश हिताच्या कार्यात सहभाग लागेल. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष आत्राम सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री शशिकांत मोकाशे यांनी केले.     ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ==============================             

*हॅलो चांदा न्यूज,*
*मुख्य संपादक,*
*शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here