==================================
माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त एस. पी. कॉलेज येथे कार्यक्रम
*चंद्रपूर*
*चंद्रपूर, (का, प्र ),शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या तत्त्वावर विश्वास ठेवून चंद्रपूरच्या शैक्षणिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी शैक्षणिक क्रांती घडवली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. नक्षल प्रभावित भागातही त्यांनी शिक्षणाचा प्रवाह पोहोचविला. ते सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राचे दीपस्तंभ होते, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. ============================= माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या जयंतीनिमित्त सरदार पटेल महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी स्व. शांतारामजी पोटदुखे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद कातकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव किर्तीवर्धन दीक्षित, उप प्राचार्य डॉ.स्वप्नील माधवशेट्टीवार आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. पुढे बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले की, शांतारामजी पोटदुखे हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक होते. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे अनेक युवक घडले आणि आज समाजाच्या विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून महाविद्यालयांची स्थापना केली. शिक्षणाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीचे सकारात्मक परिणाम आपण आज पाहत असल्याचे ते म्हणाले.
शांतारामजींनी जनसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. चार वेळा खासदार म्हणून काम करताना त्यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी भरीव प्रयत्न केले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून देशाच्या आर्थिक निर्णयांमध्ये मोलाची भूमिका बजावली. मात्र, ते केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर समाजसेवेचे जाज्वल्य उदाहरण होते. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून आपण समाज उन्नतीसाठी प्रयत्न करायला हवेत असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शांताराम पोटदुखे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. यावेळी अनेक मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===============================
*हॅलो चांदा न्यूज,मुख्य संपादक,शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356