==================================
*चंद्रपूर*
चंद्रपूर(का.प्र.): ०१ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ पावेतो जिल्हात रस्ता सुरक्षा महिना चालु आहे. सदर रस्ता सुरक्षा महिण्यामध्ये पोलीस विभागामार्फत नागरीकांमध्ये व विद्यार्थ्यामध्ये वाहतुक नियमांविषयी जनजागृत्ती व्हावी याकरीता अनेक ठिकाणी वाहतुक नियमाविषयी जनजागृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अपघातास कारणीभुत असलेले घटक जसे की, दारू पिवुन वाहन चालविणे, विरूध्द दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सिट, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे,धोकादायकरित्या वाहन चालविणे असे अनेक प्रकारचे कलमांविषयी जनजागृत्ती करण्यात येत आहे. तरी पण बरेचसे नागरीक व विद्यार्थी हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतांना दिसुन येत आहे.
*वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन केल्यास*
१) दारू पिवुन वाहन चालविल्यास कोर्टामध्ये १०००० रू दंड व ६ महिने लायसन्स निलंबनाची कारवाई होवु शकते.
२) विरूध्द दिशेने वाहन चालविल्यास कोर्टामध्ये खटला दाखल होवु शकतो.
३) ट्रिपल सिट वाहन चालविल्यास १००० रू दंड व ३ महिण्याकरीता लायसन्स निलंबनाची कारवाई होवु शकते.
४) वाहन चालवितांना मोबाईलवर बोलतांना आढळल्यास १००० ते १०००० रू पर्यंतचा दंड व ३ महिण्याकरीता लायसन्स निलंबनाची कारवाई होवु शकते.
५) अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास मोटार मालक / पालक यांना ३ वर्षापर्यत शिक्षा व २५००० रू पर्यंतचा दंड होवु शकतो. तसेच अल्पवयीन मुलांनी अपघात केल्यास त्यांना त्याच्या वयाच्या २५ वर्षापर्यंत लायसन्स मिळत नाही.
६)धोकादायकरित्या वाहन चालविल्यास कोर्टात खटला दाखल होवु शकतो.
त्यामुळे कोणीही वाहतुक नियमांचे उल्लंघन करू नये. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ पासुन जिल्हयात विशेष मोहिम राबवुन कडक कारवाई करण्याबाबत चे निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहे. तरी जिल्हयातील सर्व नागरीकांना व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की मोटार वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्देश दिले आहे, हे मात्र विशेष! ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
*हॅलो चांदा न्यूज,मुख्य संपादक,शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356