घुग्घुस शहराच्या विकासासाठी ठोस पावले उचला – आ. किशोर जोरगेवार

0
11

==============================

घुग्घुस

जिल्हाधिकारीघुग्घुस कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. घुग्घुस शहराच्या आणि परिसराचा सर्वांगीण विकासासाठी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, क्रीडा संकुल आणि पुनर्वसन योजनांवर ठोस निर्णय घेऊन त्यांची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. निधीची गरज असल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवा, आम्ही पाठपुरावा करू, घुग्घुससारख्या वाढत्या शहरांसाठी नियोजनबद्ध विकास महत्त्वाचा असून, तसे नियोजन करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

चंद्रपूर शहर आणि घुग्घुस परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत अमृत 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, शहरातील स्वच्छता, घुग्घुस नगर परिषदेच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत आणि क्रीडा संकुल उभारणीसाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार,  घुग्घुस नगर परिषद मुख्य अधिकारी राजनकर, नायब तहसीलदार राजू धांडे, क्रीडा अधिकारी  तसेच इतर संबंधित अधिकारी आणि भाजप नेते मनोज पाल, दशरथ सिंग ठाकूर, संतोष नुने, संजय तिवारी, राजकुमार गोडछेडवार, श्याम आगदरी, निरीक्षण ताद्रा, साजन गोहणे, सोनल भरटकर, स्वप्नील वाढई, विजय सिंग, मयूर कलवल, राजेश मोरपाका, विशाल दामीर उपस्थित होते.

बैठकीत घुग्घुस नगर परिषदेच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी २५ एकर जागा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागांचा वापर पाणीपुरवठा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी करण्यात यावा, यावरही भर देण्यात आला. भूस्खलन आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांसाठी पुनर्वसन उपाययोजनांवर चर्चा करत, त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. घुग्घुसमधील एसडब्ल्यूएम क्षेत्राची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. याशिवाय, सर्वे क्रमांक ३१८ वरील निस्तार हक्क काढण्याच्या प्रक्रियेवर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. बैठकीदरम्यान, सामाजिक दायित्व निधी अंतर्गत डस्ट सक्शन मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत जिल्हा परिषदेकडे असलेल्या १.१५ कोटी निधीच्या विनियोगावर चर्चा झाली. त्याचा उपयोग विकासकामांसाठी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. मायनॉरिटी विभागाकडून मंजूर झालेल्या २५ लाख निधीच्या वापराबाबतही सविस्तर माहिती घेण्यात आली असून, आवश्यक तेथे हा निधी वापरण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.

या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या सोयीसाठी, शहर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प वेगाने राबवले जातील. या बैठकीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल. घुग्घुससारख्या वाढत्या शहरांसाठी नियोजनबद्ध विकास महत्त्वाचा आहे. क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रणा उभारणे आणि नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी मिळवणे या प्राधान्याच्या बाबी आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने कार्य करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या         ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ============================                 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here