वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटूंबियांना देण्यात येणा-या १५ लक्ष रू. अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ करत ही रक्कम २० लक्ष रू. इतकी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच तेंदूपत्ता रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणारी रक्कम यापूढे पूर्णपणे मजूरांना बोनसच्या स्वरूपात देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा भाजपा तसेच महानगर जिल्हा भाजपातर्फे वन व सांस्कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
२०१४ ते २०१९ या काळात वनमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनमानसावर आपल्या कार्यकर्तृत्वाची अमीट छाप सोडणारे वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री पदाचा कार्यभार सांभाळताच महत्वपूर्ण निर्णय घेत वनक्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी व त्यामुळे संबंधित कुटूंबियांची होणारी आर्थिक परवड त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांच्या हल्लयात पशुधन मृत झाल्यामुळे शेतक-यांना बसणारा आर्थिक फटका लक्षात घेता श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे तेंदूपत्त्यापासून वनविभागाला रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणा-या राशीमधून प्रशासकीय खर्च वजा जाता उर्वरित रक्कम तेंदूपत्ता मजूरांना बोनस म्हणून दिली जायची. मात्र आता यापुढे रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणारी रक्कम पूर्णपणे मजूरांना बोनसच्या स्वरूपात देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तेंदूपत्ता मजूरांना आर्थीकदृष्टया स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल अतिशय महत्वपूर्ण आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी म्हटले आहे.
या दोन्ही निर्णयांबद्दल जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, सौ. संध्या गुरनुले, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे, नामदेव डाहूले, राजेश मुन, कृष्णा सहारे, महानगर सरचिटणीस राजेंद्र गांधी, ब्रिजभुषण पाझाडे, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अलका आत्राम, महिला आघाडी महानगर जिल्हाध्यक्षा सौ. अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, रामपाल सिंह, हनुमान काकडे, चंद्रकांत धोडरे, गौतम निमगडे, राहूल संतोषवार, किशोर पंदिलवार, रमेश पिपरे, राजू बुध्दलवार, गोविंद पोडे, प्रभाकर भोयर, सोमेश्वर पदमगिरीवार, चंदू मारगोनवार, सौ. पुजा डोहणे, सौ. जयश्री वलकेवार, विनोद देशमुख, ज्योती बुरांडे आदींनी केले आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793