उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची दखल पॉलिटेक्निक अभ्यासक्रमातील अनुतीर्ण विद्यार्थ्यांची होणार लेखी परीक्षा

0
28

अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आला. आणि परीक्षा मात्र लेखी स्वरुपात घेण्यात आली असल्याने तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमातील बहुतांश विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहे. त्यामुळे निकालात दुरुस्ती करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना केली होती. याची ना. चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत यावर तोडगा काढत तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमातील अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थांची लेखी परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळात अनेक महाविद्यालय बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुर्ण केला गेला. मात्र कोरोनाची लाट ओसरताचं सदर महाविद्यालयाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने योग्यरित्या अभ्यासक्रम समजता न आल्याने घेण्यात आलेल्या ऑफलाईन परिक्षेत विद्यार्थ्यांना अपेक्षीत यश संपादित करता आले नाही.

असाच काहीसा प्रकार तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसोबत घडला आहे. महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. परंतु यामध्ये बहुतांश विद्यार्थी अनुतीर्ण  झाले आहे. कोविड महामारीमुळे शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले आहे. आणि परीक्षा मात्र लेखी स्वरुपात घेण्यात आली असल्याने बहुतांश विद्यार्थी अनुतीर्ण झाले असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

अशी तक्रारही विद्यार्थ्यांनी चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदनाच्या माध्यमातुन केली होती. या निवेदनाच्या आधारे आमदार किशोर जोरगेवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत पॉलिटेक्निक विद्यार्थांच्या भविष्याचा विचार करून परीक्षेचे मौखिक, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि लेखी परीक्षेचे गुण एकत्रितरीत्या ग्राह्य धरून निकालात दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.

याची ना. चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली असुन यावर तोडगा काढण्यासाठी तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमातील अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थांची लेखी परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिण्याच्या १५ ते ३० तारखेला परिक्षा घेण्यात येणार आहे. पॉलिटेक्नीकला डिप्लोमा नंतर थेट व्दितीय वर्षाला  १० टक्के कोटा असतो. घेण्यात येणार असलेल्या परिक्षेचा निकाल जाहिर होई पर्यंत सदर कोटाही थांबविण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे पॉलिटेक्नीकच्या परिक्षेत अनुतिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here