विषय: रिक्त असलेल्या शासकीय पदभरती लवकर सुरू करा. -आम आदमी पार्टी, बल्लारपुर

0
109

गुरुवार दिनांक:- 25 ऑगस्ट 2022 रोजी बल्लारपूर युथ संयोजक सागर कांबळे जी यांच्या नेतृत्वाखाली व शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार, शहर निवळणूक प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली, रोहित जनगमवार यांच्या सहयोगाने, तहसीलदार डॉ. कांचन जगताप मॅडम यांना निवेदन देण्यात आले, सद्याच्या स्थितीत राज्य पोलीस दलात 29 हजार पदे रिक्त आहेत व यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने 7 हजार पदांची पोलीस भरती घेण्याचे घोषित केले होते. परंतु दरवेळी भरतीच्या नवनवीन तारखा देण्यात आल्या व पद भरती काही झाली नाही. तसेच 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या 13,514 पदांची जाहिरात निघाली व सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज पण केला होता, त्यानंतर सरकारे बदलत गेली मात्र अजूनही जी. प. च्या परीक्षा प्रलंबित आहेत, याशिवाय पशुसंवर्धन भरती व आरोग्य विभागाच्या पेपर फुटीनंतर रद्द झालेल्या पदाची पुनः परीक्षा देखील अजून झाली नाही, या सर्व समस्यांचा विचार करून सर्व पद भारत्या जाहीर करण्यात याव्या तसेच चार-पाच वर्षांपासून ज्या परीक्षा प्रलंबित आहेत त्या तात्काळ घेन्यात याव्या व वनरक्षक पदांची सुद्दा भरती लवकर सुरू करावी, या सर्व भारत्या वेळेवर न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा सुद्धा ओलांडली आहे, तरी अशा विध्यार्थ्याचा विचार करून वयोमर्यादेत वाढ करून द्यावी असे सुद्धा निवेदनाव्दारे मांग करण्यात आली,
निवेदनात प्रतिलिपी म्हणून मा. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, ग्रामविकास मंत्री तसेच बल्लारपूर शहराचे आमदार साहेब यांना सुद्धा निवेदन करण्यात आले.
या विषयी आम आदमी पार्टी, बल्लारपुरला खलील प्रमाणे समर्थन जाहिर केले।
1) स्टडी ट्रैक अकादमी, बल्लारपुर
2) बैंकिंग स्टडिपॉइंट, बल्लारपुर
3) देशी फिटनेश ग्रुप, बल्लारपुर
4) छत्रपति शंभाजी महाराज अकादमी, बल्लारपुर
5) लक्ष्मी स्पोर्टिंग एसोसिएशन, विसापुर
6) भगत सिंग ग्रुप, बल्लारपुर
निवेदन देताना शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफज़ल अली, गणेश सिलगमवार, सचिव ज्योतिताई बाबरे, यूथ संयोजक सागर कांबळे, उपाध्यक्ष गगन सकिनाला, CYSS प्रमुख शिरीन सिद्दीकी, सह प्रमुख आशीष गेडाम, शहर महिला संयोजिका अलकाताई वेले, उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, संघठन मंत्री, सरिता गुजर, रोहित जनगमवार, सुदाकर गेडाम, दुर्गा शेंडे, श्रीकांत टेमबुरडे, अकादमीचे गुरु आणि इत्यादि सैकड़ों कार्यकर्ते, विद्यार्थी यांची उपस्थिति होती।

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here