==================================
*चंद्रपूर*
चंद्रपूर(वि.प्र.):मुस्लिम समाज बांधवांचे वतीने दिनांक 13.02 2025 चे रात्री शब-ए-बरात (बडी रात)सर्वत्र साजरी करण्यात येत असून शब-ए- बरात (बडी रात) च्या अनुषंगाने आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7.15 वाजता पोलीस ठाणे रामनगर येथे रामनगर चे प्रभारी पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थितीत रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील मज्जिद, मौलाना, मदरसा, कब्रस्तान कमिटी सदस्य, पदाधिकारी, शांतता समिती सदस्य यांच्या उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली. जातीय सलोखा कायम रहावा या दृष्टीकोनाने ही बैठक घेण्यात आली.सदर बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली, मदिना मस्जिद चे अध्यक्ष बाबू खान,उपाध्यक्ष युसुफुद्दीन सय्यद,सचिव रऊफ शेख, बरकत भाई, मस्जिद ए अक्सा चे अध्यक्ष एजाज खान,सचिव अमीर जब्बार बेग, रयतवारी कॉलरी मस्जिद चे अध्यक्ष सैजुद्दीन शेख, रामनगर शांतता समिती सदस्य ताजुद्दीन शेख, के. जी. एन.मस्जिद चे मुश्ताक उस्मान शरीफ,मक्का मस्जिद चे कोषाध्यक्ष मजीद खान विशेष शाखेचे राजू आर्वेलीवार, सुभाष शिडाम सह अनेक मान्यवर या बैठकीत उपस्थित होते.
=============================== मुस्लिम पदाधिकारी यांचे सोबत शब-ए- बरात धार्मिक कार्यक्रम संदर्भात सविस्तर चर्चा करून कार्यक्रमाचे स्वरूप नमाज अदा करण्याची वेळ, तकरीर बयान च्या वेळा तसेच मुस्लिम समुदाय कब्रस्तान येथे त्यांचे पूर्वजांना स्मरण करण्यास मोठ्या संख्येने जात असतात गर्दीची वेळ व इतर माहिती ही जाणून घेण्यात आली व सदरचे धार्मिक कार्य व्यवस्थित संपन्न होण्याचे दृष्टीने वरिष्ठांकडून प्राप्त सूचना व मार्गदर्शन रामनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्याकडून करण्यात आल्या, हे मात्र विशेष! =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356