सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आगामी सण उत्सव साजरे करावे: सुभाष चौधरी.

0
12

===============================

सण, उत्सव साजरे करतांना प्रशासनाच्या नियमांचे पालन करा. जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाचे नागरिकांना आवाहन.

जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न.

                     *चंद्रपूर*   

             हॅलो चांदा न्युज 

चंद्रपूर(का.प्र.):चंद्रपूर जिल्हा शांतता समितीची बैठक 18 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे संपन्न झाली.चंद्रपूर जिल्हा शांतता समितीची ही बैठक आगामी सण उत्सव साजरे व्हावे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून घेण्यात आली होती. या बैठकीत आगामी काळात शिवजयंती, महाशिवरात्री, होळी, रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे सर्वधर्मीय 11 सण येत आहे. हे सण जिल्हयात मोठ्या प्रमाणात साजरे होणार असून चंद्रपूर हा जिल्हा शांततेसाठी प्रसिध्द आहे. सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आगामी सण उत्सव साजरे करावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी केले. जिल्ह्याचा लौकिक कायम राखण्यासाठी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत आणि उत्साहात साजरे करतांना प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ही अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी केले.

नियोजन सभागृह येथे पोलिस दलातर्फे आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मंचावर आमदार सुधाकर अडबाले, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू , सहायक पोलिस अधिक्षक अनिकेत हिरडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड
विराजमान होते.चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, प्रवीण खोब्रागडे, अंजली घोटेकर, प्रशांत विघ्नेश्वर या सर्व जिल्हा शांतता समिती सदस्यांनी अनेक सूचना केल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा सर्व सण उत्सव साजरे व्हावे या उदात्त दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या या सभेत ध्वनिक्षेपकाचे आवाज मर्यादित असावे, महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन केल्यास अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी, मोकाट जनावराचे बंदोबस्त करावे, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने ध्वनिक्षेपकाचे आवाज कमी ठेवून आपले सामाजिक दायित्व जपावे, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दखल घ्यावी, कोणतीही अफवा पसरल्यास त्यास जागीच थांबवावे, रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, सह अनेक सूचना या बैठकीत उपस्थित मान्य मान्यवरांकडून करण्यात आल्या.सण आणि उत्सवासंदर्भात प्रशासनाकडून देण्यात येणा-या सूचनांचे सर्वांनी गांभिर्याने पालन करणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगून सुभाष चौधरी म्हणाले, शहरात तसेच तालुका स्तरावर महसूल, नगर पालिका प्रशासन आाणि पोलिस विभागाच्या अधिका-यांनी मिरवणुक/रॅली, पदयात्रा मार्गाला त्वरीत भेट देऊन पाहणी करावी. मिरावणूका काढतांना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच दुचाकी-चारचाकी वाहने सुरळीत वाहतूक करू शकतील, याची दक्षता घ्यावी. लेजर लाईटवर बंदी आहे, त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये. डीजेचा आवाज मर्यादेतच ठेवावा. राष्ट्रगीत आणि राज्यगीताचा एक ठराविक प्रोटोकॉल आहे, त्यामुळे डीजेवर राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवू नये. तसेच मंडळांनी फायर ऑडीट करून घ्यावे, अशा सुचना करत सुभाष चौधरी यांनी सर्वांना आगामी सण उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.नागरीकांनी सण साजरे करतांना आपली सामाजिक जबाबदारी ठरवावी : अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू.

सण, उत्सव साजरे करणे ही आपली संस्कृती आहे. सर्व सण मिळून साजरे केल्याने सामाजिक सलोखा राखला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी सण साजरे करतांना आपली सामाजीक जबाबदारी ठरवावी, असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले. पुढे त्या म्हणाल्या, कोणतीही मिरवणूक काढण्याआधी प्रशासनाकडून रितसर परवानगी घ्यावी, जिल्हयात रॅली, मिरवणूक तसेच बॅनर लावण्यासाठी देण्यात येणारी परवानगी प्रकीया ऑनलाईन करण्यात आलेली आहे, या सूविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा. तसेच चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्ह्यात सर्वधर्मसमभाव नेहमी जोपासला जातो सर्व एकत्र येऊन सर्व सण उत्सव साजरे करतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्था आपल्या सर्वांच्या सहकार्याने अबाधित राहणारच असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करीत जिल्हा शांतता समिती सदस्याकडून करण्यात आलेल्या सूचनेबद्दल सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे
आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, कोणतेही सण, उत्सव साजरे करतांना शहरात बॅनर लावण्यात येतात. सदर बॅनर लावण्याबाबतची रितसर परवानगी घेणे आवश्यक असून याबाबत 24 तास ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सूविधा देण्यात आली आहे, त्यामुळे मा.उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मनपा प्रशासन अवैध बॅनर संदर्भात गंभीर असून अवैध बॅनर धारकांवर गेल्या काही दिवसात गुन्हे दाखल करण्यात आले.असल्याचे सांगितले चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात येईल असे देखील यावेळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन होम डि.वाय.एस.पी. निशिकांत रामटेके यांनी केले.

या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरचे अधीक्षक नितीन धार्मिक, डॉक्टर बंडू रामटेके, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लता वाढिवे, चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे विजय राऊत, सदस्य मुनीर पटेल, रब्बानी, दिनेश राठोड, इबादुल सिद्दिकी, शहर शांतता समितीचे सदस्य डी.के. आरिकर, दर्शन बुरडकर, मोरेश्वर खैरे, शेख अमजद, विशेष शाखेचे सुभाष शिडाम सह अनेक मान्यवरांची या बैठकीला उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन म.पो.शि. मंगला आसुटकर यांनी केले.          =============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*       ============================                 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here