===============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर, (का प्र ):पोंभुर्णा तालुक्यातील कोसम्बी रिठ येथील एम आय डी सी साठी संपादित शेतजमिनींचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यासाठी उच्चाधिकार समितीच्या दि. १९.१०.२०१८ रोजी संपन्न झालेल्या ९८ व्या बैठकीमध्ये
रु.१०,००,०००/-प्रती हेक्टरी दरास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर प्रकरणी मऔवि महामंडळाच्या दि.०५.०८.२०१९ च्या पत्रान्वये भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांना रु.०६,०७,५२,६६२/- इतकी रक्कम भूसंपादनकामी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना रु.२.२१ कोटीचे वाटप करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
कोसंबी रिठ (ता.पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) येथील शेतकऱ्यांची शेतजमीन एमआयडीसीसाठी संपादीत करण्यात आली असून अद्याप उक्त जमिनीचा मोबदला संबंधितांना देण्यात आला नसल्याची बाब आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणली. म.ओ.वि.मं. अधिनियम १९६१. ३२ (२) अन्वये भूमीअधिग्रहण प्रकल्पबाधित भूखंड भोगवटाधारकांना दर हेक्टरी ८० लक्ष रूपये भाव देण्यात यावा किंवा उक्त भूखंड भूसंपादन प्रक्रियेमधून वगळण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्याचे देखील आ. मुनगंटीवार यांनी उपप्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणले.महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अन्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत आहे असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===========================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356