=============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(वि.प्र.): पोलीस ठाणे चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या अध्यक्षतेखाली आगामी शहीद क्रांतीवीर बाबुराव पूलेस्वर शेडमाके जयंती, होळी धुलीवंदन , रमजान ईद, गुढीपाडवा इत्यादी सण उत्सव प्रसंगी जातीय सलोखा राखून शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे व आगामी सण उत्सव शांततेत व्हावे या करिता दिनांक 11/03/2025 रोजी सायंकाळी 17/00 ते 18/15 वा. दरम्यान शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, उत्सव संयोजक यांची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सलोखा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये शहीद क्रांतीवीर बाबुराव पूलेसुर शेडमाके जयंती, होळी, धुलीवंदन, रमजान महिना , गुढीपाडवा इत्यादी सणाबाबत माहिती घेऊन वरिष्ठानकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना व निर्देश अन्वये आवश्यक सूचना पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी केल्या तसेच या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी सर्व सण उत्सव शांततेने उत्साहाने व आनंदाने पार पडतील असे विश्वास या प्रसंगी व्यक्त करीत चंद्रपूर जिल्ह्याची गरिमा कायम राहणार असे ही मत व्यक्त केले.
सण उत्सव काळात कुठलीही अप्रिय घटना आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळविण्याबाबत ची विनंती देखील पोलिस विभागाकडून करण्यात आली.
या बैठकीला जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली,जिल्हा शांतता समिती सदस्य प्रवीण खोब्रागडे,जिल्हा शांतता समिती सदस्य विजय राऊत, जिल्हा शांतता समिती सदस्य ॲड आशिष मुंदडा,जिल्हा शांतता समिती सदस्य परमार,चंद्रपूर शहर शांतता समितीचे सदस्य सागर खोब्रागडे,प्रशांत हजबन,श्रीमती रेखा धनंजय दानव,मोरेश्वर खैरे, राठोड, छोटी मस्जिद कमिटी चे साबीर भाई, विशेष शाखेचे सुजित बंडीवार सह अनेक मान्यवर पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, उत्सव संयोजक बहुसंख्येने उपस्थित होते. ========================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356