महाकाली यात्रा परिसरातील व्यवस्थेची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी.

0
8

==============================

विविध विभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होतीसमन्वयाने उत्तम व्यवस्था करण्याच्या सूचना

                        चंद्रपूर   

             हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर, (का प्र):–  3 एप्रिल पासून चंद्रपूरात सुरु होणार असलेल्या चैत्र नवरात्र यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाच्या अधिका-यासंसह यात्रा परिसराची पाहणी केली. ही यात्रा आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेली असून, भाविकांना आध्यात्मिक शांती आणि सुरक्षित दर्शन अनुभव मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे.

या  यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी यादव, शहर पोलिस निरिक्षक प्रभावती ऐकुरे, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील, तहसीलदार विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमरशेट्टीवार, शहर अभियंता विजय बोरीकर, यांच्यासह वेकीलीचे आणि महावितरण विभागाचे अधिकारी आदि अधिका-यांची उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनांनतंतर चैत्र नवरात्र यात्रेत येणा-या भाविकांच्या व्यवस्थेसाठी प्रशासन कामाला लागले आहे. या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात बैठक घेत अधिका-यांना महत्वाच्या सुचना केल्या होत्या. तर आज त्यांनी प्रत्यक्ष यात्रा परिसराला भेट देत सर्व विभागाच्या अधिका-यांसह परिसरात करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली आहे.

पार्किंग व्यवस्था, यात्रा परिसराचा विस्तार, राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छता, ट्रॅफिक नियंत्रण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यात्रेच्या सुव्यवस्थेसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. श्री महाकाली माता यात्रा ही चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक यात्रा असून, राज्यभरातून लाखो भाविक माता महाकालीच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सुसज्ज नियोजन करणे ही आपली जबाबदारी आहे. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही, गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे होईल आणि सर्व सुविधांची पूर्तता होईल असे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.

यात्रेच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी येताना आणि परत जाताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे. वाहतूक व्यवस्था योग्य प्रकारे नियोजित केली पाहिजे. कोणत्याही प्रकारे ट्रॅफिक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बाहेरून येणार्या भाविकांसाठी निवास, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा या सर्व बाबींवर विशेष लक्ष दिले पाहिजे.

  पिण्याच्या पाण्याची सोय पुरेशा प्रमाणात असावी. उन्हाच्या झळा वाढलेल्या असताना, भाविकांना शुद्ध आणि थंड पाणी सहज उपलब्ध होईल, यासाठी यात्रा मार्गावर आणि मंदिर परिसरात भरपूर पाण्याचे ठिकाणे असावीत. यात्रा परिसरात कचरा साचणार नाही, यासाठी नियमित साफसफाई आणि कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था महापालिका आणि मंदिर प्रशासनाने उभारावी, यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षितता हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असावा, सीसीटीव्हीच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस विभागाला केल्या आहे. व्यवसायिक आणि दुकानदारांनी देखील यात्रेच्या वेळेस शिस्तबद्ध पद्धतीने आपला व्यवसाय करावा. वीज वितरण आणि इतर महत्त्वाच्या सुविधा पुरवणार्या यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्ते व्यवस्थित असावेत, प्रकाशयोजना योग्य प्रकारे कार्यरत असावी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देता यावे, यासाठी सर्व स्तरांवर योग्य नियोजन असावे अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.  यावेळी  श्री महाकाली माता ट्रस्टचे श्याम धोपटे, अजय जयस्वाल, सुनिल महाकाले, मिलिंद गंपावार, पवन सराफ, अजय वैरागडे, सुरेश महाकुळकर, अॅड. विजय मोगरे, तुषार सोम, दशरथ सिंग ठाकुर, मनोज पाल, छबु वैरागडे, सविता दंढारे, अमोल शेंडे, करणसिंग बैस, नकुल वासमवार, सलीम शेख, कालीदास धामनगे, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.    ==========================  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =======================             

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here