विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी – आ. सुधीर मुनगंटीवार

0
5

================================

सशक्त महिला, समृद्ध समाज देशाच्या विकासाची खरी ताकद – सौ. सपना मुनगंटीवार
पोंभूर्णा येथे महिला सांस्कृतिक महोत्सव व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

                        चंद्रपूर

            हॅलो चांदा न्यूज 

चंद्रपूर,(का प्र):- स्त्री ही शक्ती आहे. तिला योग्य संधी मिळाल्यास ती कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या पुढे जाऊ शकते. महिला केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकते. विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आ, सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पोंभूर्णा येथे आयोजित महिला सांस्कृतिक महोत्सव व कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात आ. मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला सौ. सपनाताई मुनगंटीवार, संध्याताई गुरनुले, अल्काताई आत्राम, सुलभाताई पिपरे, विद्याताई देवाडकर आदींची उपस्थिती होती.

आ. मुनगंटीवार म्हणाले, केवळ सांस्कृतिक सादरीकरणच नव्हे तर समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी देखील या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात बोलताना सौ. सपनाताई मुनगंटीवार म्हणाल्या, स्त्रीमध्ये खूप मोठी शक्ती असते. महिलांनी निश्चय केला तर संपूर्ण जग जिंकू शकते. “महिला सृष्टी सृजनाचे, संगोपनाचे, नवीन पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. आई ही प्रथम गुरु असते. ती समाजात चांगले संस्कार रुजवते. महिलांनी आपल्या दैनंदिन कार्यासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यावी. कारण सशक्त महिला सशक्त समाज व सशक्त देश घडवू शकते जे देशाच्या विकासाची खरी ताकद आहे, असे मत सौ. सपनाताई मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित महिलांची गर्दी पाहून या कार्यक्रमाच्या निमित्ताने जणू शक्तिपीठच अवतरले आहे, असे वाटत असल्याचे सौ.सपनाताई मुनगंटीवार म्हणाल्या.

यावेळी आ, सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्याचा उल्लेख करताना सौ. सपनाताई मुनगंटीवार म्हणाल्या, दिन, दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग व निराधारांसाठी नेहमी सुधीरजी कार्यरत राहिले आहेत.बल्लारपूर विधानसभेचा सर्वांगीण विकास त्यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. ते महिला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विधानसभेत सातत्याने आवाज उठवतात.” संपूर्ण मतदारसंघाचा विचार एका कुटुंबाप्रमाणे नेहमी करतात, असेही सौ.सपनाताई मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महिलांचा सत्कार
शितल लेनगुरे, खुशाली सातपुते, रूपाली भाकरे, भाग्यश्री देठे, आशा झाडे, शालीनी कुमरे, संगीता कुळमेथे, सविता मडावी, सरिता मून या विवीध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सत्कार आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.    ================================      *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      ==============================

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here