============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र ):- पोलीस स्टेशन दुर्गापुर अंतर्गत मौजा वरवट शेत शिवारातील अस्वल ढोडा नाल्यामध्ये यातील आरोपी मोहदारूची हातभट्टी लावून मोहा दारूची निर्मिती करीत.
असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून पंचासह सदर ठिकाणी दारूबंदीबाबत रेड केली असता सदर ठिकाणी 1) 02 लोखंडी ड्रम मध्ये 300 लिटर गरम मोहा सडवा ड्रमसह कि.32000/- 2) 02 प्लास्टिक ड्रम मध्ये मोहा सडवा ड्रमसह कि.30,800/_ 3) 02 प्लास्टिक डबक्यांमध्ये गावठी मोहा दारू 40 लीटर डबकीसह की.6,200/- 4) 02 प्लास्टिक ड्रम की.800/ 5) 02 जर्मन घमेले की 2,000/ 6) 02 पीपे,01 स्टील बकेट,01 प्लास्टिक गाळणी, 02 प्लास्टिक पाईप तुकडे की.300/_ असा एकूण 72,100 / रु चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी 1. धनराज खोब्रागडे 2. दिनेश रायपुरे 3. प्रतिमा रायपुरे सर्व रा.वरवट यांचेविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संदीप इकडे पाटील यांचे नेतृत्वात पो हवा स्वप्निल बुरीले, गुरुदेव मजोके आणि वरवट येथील पोलीस पाटील श्रीमती ललिता रायपुरे यांनी केली आहे. ========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

























