Home
Home Breaking News पोलीस ठाणे कोठारी ची उत्तम कामगिरी! ३ लक्ष २४ हजार ९७० रुपयाची...

पोलीस ठाणे कोठारी ची उत्तम कामगिरी! ३ लक्ष २४ हजार ९७० रुपयाची मालमत्ता जप्त!

0
73

=========================

 हॅलो चांदा न्युज

बल्लारपूर(ता.प्र.): बल्लारपूर तालुक्यातील कोठारी पोलिस स्टेशन अंतर्गत देशी – विदेशी दारुची अवैध वाहतुक करणारे इसमास अटक करण्यात आली असून ३ लक्ष २४ हजार ९७० रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे हि कारवाई दिनांक १३ एप्रिल, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरून करण्यात आली असून पोलीस स्टेशन कोठारी अंतर्गत कोठारी चौकात नाकाबंदी करून चारचाकी वाहन ह्युंदाई आय 10 कार क्र. एम. एच. ३३-ए-३००२ यास थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर वाहन भरधाव वेगाने चौकातुन निघुन गेल्याने त्याचा पाठलाग करुन मौजा गणपुर गावाजवळ त्यास थांबवुन पंचासमक्ष सदर वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनाच्या डॅशबोर्ड मध्ये गुप्तरित्या लपवुन ठेवलेली देशी दारु च्या ९० एम. एल. च्या एकुण ५२ नग प्लॉस्टीक बॉटल, रॉयल स्टॅग १८० एम.एल.च्या २१ नग बॉटल, हायवर्ड ५००० बिअर चे बॉटल आणि आय 10 कार असा एकुण ३,२४,९७०/- रुपयाचा माल मिळुन आल्याने आरोपी वाहन चालक नामे रितीक निलकंठ कन्नाके वय २९ वर्ष रा. बल्लारशाह व क्लिनर नामे मुख्तार मुस्ताक शेख वय ३१ वर्ष रा. बल्लारशाह यांना अटक करुन त्यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  सदरची कामगिरी चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन कोठारी चे ठाणेदार योगेश खरसान व स्टॉफ यांनी केली आहे.                       =========================                              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ============================                     *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here