आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ३२ नवीन हातपंपांना मंजुरी

0
11

===========================

                           बल्लारपूर 

                       हॅलो चांदा न्युज

बल्लारपूर,(का प्र ) :- उन्हाच्या तीव्र तडाख्यात पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये हातपंप बसविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश लाभले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ३२ नवीन हातपंप मंजुर झाले असून याकरिता एकूण ६९ लक्ष ६० हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे, नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल नागरिकांनी आ.मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
ग्रामीण भागात उन्हाळ्यात भासत असलेल्या तीव्र पाणीटंचाईची गंभीर दखल घेत आमदार श्री. मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केले. नागरिकांच्या मूलभूत गरजांवर तातडीने पाठपुरावा केल्यामुळे हा निर्णय शक्य झाला. या मंजुरीअंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, विसापूर, बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्ड, पंडित दीनदयाल वार्ड, कन्नमवार वार्ड, तसेच आरओ मशीन जवळ हातपंप बसविण्यात येत आहे. मुल तालुक्यातील कारवान, कांतापेठ, कोरंबी, टोलेवाही, पिपरी दिक्षीत, बोडांळा (बु.) तर पोंभुर्णा तालुक्यातील आंबी तुकूम, घनोटी तुकूम, चक ठाणेवासना, चक फुटाणा, थेरगांव रय्यतवारी आणि दिघोरी तसेच चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा, जुनोना रयतवारी, दुर्गापुर या गावातही हातपंप बसविण्याचे काम हाती घेण्यात.येत आहे.
या निर्णयामुळे पाणीटंचाईग्रस्त भागांतील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार असून, लोकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. मूलभूत सुविधांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आणि जनतेसाठी तत्परतेने कृती करणाऱ्या जागृत लोकप्रतिनिधी म्हणून आ.मुनगंटीवार यांची भूमिकाही या निर्णयातून अधोरेखित झाली आहे.   =============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*                  ================================             *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                                       *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here