==============================
भद्रावती
हॅलो चांदा न्युज
भद्रावती.(का प्र) :- आजच्या सामाजिक परिवर्तनाच्या युगातही जाती-पातीचे बंधन प्रेमाच्या नात्याला अडथळा निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते.सुरज शहा यांच्या मार्गदर्शनात व.सुमित हस्तक यांच्या पुढाकाराने एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य पार पाडले.
एका प्रेमी युगलाचा त्यांच्या वेगवेगळ्या जातींमुळे कुटुंबीयांकडून विवाहास विरोध होत होता. मात्र प्रेमाच्या या नात्यावर विश्वास ठेवत आणि सामाजिक विषमतेविरुद्ध उभं राहत, सुमित हस्तक यांच्या वतीने या प्रेमी युगलाचा विवाह आयोजित करून समाजाला एक सकारात्मक संदेश देण्यात आला.
हा विवाह केवळ दोन व्यक्तींना एकत्र आणणारा प्रसंग नव्हता, तर जातीभेदाच्या रूढ सामाजिक चौकटींना छेद देणारा एक क्रांतिकारी टप्पा ठरला आहे. या धाडसी निर्णयाने नव्या पिढीसमोर प्रेम, समता आणि सामाजिक एकोपा याचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे.
सुमित हस्तक यांच्या या कार्यामुळे समाजात एक नवीन विचारधारा पेरली जात आहे — जी जातीपातीत न अडकता माणूसपणाला प्राधान्य देते. या समाज परिवर्तनासाठी त्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356