Home
Home चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गांधी चौक ते जिल्हाधिकार्यालयापर्यंत धडक मोर्चा!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गांधी चौक ते जिल्हाधिकार्यालयापर्यंत धडक मोर्चा!

0
63

                          चंद्रपूर       

                    हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर शहरातील ज्वलंत समस्यांना घेऊन लोकहितार्थ चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट च्या वतीने चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला.

या धडक मोर्चाचे नेतृत्व चंद्रपूर जिल्हा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दीपक जयस्वाल यांनी केले तर शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांच्या पुढाकारातून हा धडक मोर्चा काढण्यात आला.यामधील चंद्रपूर शहरातील ज्वलंत समस्याचे निराकरण व्हावे याकरिता हा धडक मोर्चा काढण्यात आला हे मात्र विशेष!

चंद्रपूर शहरातील नागरिकांना सर्वात मोठ्या प्रमाणात घर टॅक्स येतोय आपल्या महाराष्ट्रात सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात घर टॅक्स कुठेही नाही मुंबई व नागपूर ला सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात घर टॅक्स आकारले जात नाही.तसेच चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन व एम आर आय मशीन बंद असल्यामुळे नागरिकांना बाहेरून सिटीस्कॅन व एम आर आय करावे लागत आहे यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या खिशातून पैसा खर्च होत असल्याने मानसिक व आर्थिक त्रास नागरिकांना सहन करावे लागत आहे. चार ते पाच हजार रुपये सिटीस्कॅन व एम आर आय साठी नागरिकांना द्यावे लागते. त्यामुळे सिटी स्कॅन एमआरआय मशीन दुरुस्त करून ही सेवा नागरिकांना प्रदान करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून सिटीस्कॅन व एम आर आय मशीन वारंवार नादुरुस्त होत असेल तर खनिज विकास निधीतून एम आर आय व सिटीस्कॅन मशीन खरेदी करून रुग्णांना ती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील या धडक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

चंद्रपूर शहरातील सरकारी शाळा बंद असल्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना शाळेपासून वंचित व्हावे लागत आहे. मागील वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी विठ्ठल मंदिर प्रभागातील डॉ. रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा व श्री अभ्यंकर प्राथमिक शाळा या दोन पैकी एका शाळेत अभ्यासिका उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्तांकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. मनपा प्रशासनाकडून सामान्य प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी अन्यथा दोन्ही शाळा पूर्ववत सुरू कराव्या असे देखील निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

अमृत जल योजनेच्या सुद्धा मुद्दा आहे मागील अनेक वर्षापासून अमृत जल योजनेचे पाणी चंद्रपूर शहरवासींना मिळत नाही मात्र बिल दर महिन्याला बराबर येतात पाणी चार ते पाच दिवसात येते मात्र बिल संपूर्ण वर्षभराचा घेतला जातो. हा न्याय आता नागरिक सहन करणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे.

मलनिस्सारण योजनेअंतर्गत संपूर्ण चंद्रपूर शहरातील रस्त्याचे खोदकाम करून ठेवले आहे पण रस्ते अजून व्यवस्थित बनविण्यात आले नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही चांगले रस्ते निर्माण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सुद्धा धडक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजना या दोन्ही योजनांचे पैसे गेल्या पाच महिन्यापासून लाभार्थ्यांना न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे लवकरात लवकर वरील दोन्ही योजनांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी देखील या धडक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे, हे मात्र विशेष!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या धडक मोर्चामध्ये शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल, शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे,ॲड. निमेश मानकर, सुहास पिंगे, मनोज बंडीवार, मारुती झाडे,कलाकार मल्लारप,विनोद लभाने,नजमा शेख. बब्बू ईसा,सुरज चव्हाण, राजेंद्र आखरे, संजय वैद्य,वसंत पवार सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                         *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here