गडचिरोली
हॅलो चांदा न्युज
गडचिरोली(जि.प्र.) ईद उल अज़्हा च्या पावन प्रसंगी गडचिरोली येथील प्रतिष्ठित शमशेरखान पठाण कुटुंबीयांची गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट घेतली व सर्वांना या पावनप्रसंगी ईदच्या शुभेच्छा दिल्या!
जिल्हा उपाध्यक्ष शमशेरखान पठाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. या भेटीदरम्यान त्यांनी पठाण कुटुंबियांसोबत ईदच्या निमित्ताने आनंदपूर्वक वेळ घालवला आणि स्वादिष्ट भोजनाचा देखील आस्वाद घेतला.
खासदार किरसान यांनी शमशेरखान पठाण आणि त्यांच्या कुटुंबियांना ईदच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ही दिल्या.
या प्रसंगी सतीश विधाते शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हाध्यक्ष अनु.जाती. विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली, रजनीकांत मोटघरे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रुपेश टिकले, पत्रकार नंदू कथवटे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

























