Home
Home चंद्रपूर यहोवा यिरे फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण दिन विविध उपक्रमाने साजरे.

यहोवा यिरे फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण दिन विविध उपक्रमाने साजरे.

0
64

                                   चंद्रपूर 

                          हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का.प्र.):- दिनांक 6 व 7 जुन रोजी यहोवा यिरे फाऊंडेशनने पर्यावरण दिनानिमित्त दोन दिवस अनेक कार्यक्रम सह विविध उपक्रम राबवून अतिशय उत्साहाने साजरे केले.या मध्ये रक्तदान शिबीर, वृक्षारोपण,व मुवी कास्टीग उपक्रम राबविण्यात आले.                हा कार्यक्रम डाॅ.संगिता खोब्रागडे स्त्रीरोगतज्ञ, सरकारी हॉस्पीटल चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटन कोमलकुमार सुर्यवंशी पोलिस उपनिरीक्षक ( वाहतुक विभाग चंद्रपूर) यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.मनिष मोते वैद्यकीय अधिकारी सरकारी हॉस्पीटल चंद्रपूर, डाॅ.रंजना गवारकर वैद्यकीय अधिकारी, मुख्य मार्गदर्शक डाॅ.गुनिका पोटदुखे रक्त संक्रमण अधिकारी सरकारी हॉस्पीटल चंद्रपूर, डाॅ.राकेश शेंडे अधिक्षक, जेष्ठ पत्रकार डि. के. आरिकर, विजय नळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, डाॅ. रमेशकुमार बोरकुटे उपाध्यक्ष पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य, सचिन पानघाटे चेअरमन यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सो. लि. चंद्रपूर, सौ.अपेक्षा जोब वाईस चेअरमन यहोवा यिरे फाऊंडेशनच्या मॅनेजर श्रीमती आणी सरकारी हॉस्पीटलची कार्यकारी टिम रामेश्वर बारसागडे समूहदेशक, रत्नघोष मेश्राम औषधी निर्माता कु.सोनु कातकर स्टाॅफ नर्स, कु.आशा गेडाम, कु.रंजना वाघाडे परिचारिका, कु.वृश्राली चिंताडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाॅआशिष, डाॅ.फराज, सोनु मरसकोल्हे, दुर्गादास गिऱ्हे, विजय कोटावार रक्तकक्ष सेवक, सौ.जयश्री कोरडे प्रयोग शाळा, व सर्व कार्यकर्ते यहोवा यिरे फाऊंडेशन टिम च्या सहकार्यातून हा दोन दिवसीय रक्तदान,वृक्षारोपण,मुवी कास्टीग चे उपक्रम कार्यक्रम अतिशय उत्साहात आनंदात पार पडले.               या कार्यक्रमाचे सूत्रधार डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर चे सिईओ सराचा एकच उद्देश आहे. शिका कमवा व प्रगती करा! पर्यावरण जागरूती व बाॅडी इन्वेस्ट्मेंट या उपक्रमातून फ्री हेल्थ कॅम्प च्या माध्यमातून पुरूष हेल्थ चेकअप, स्त्रियासाठी हेल्थ चेकअप व रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते यात 163 लोकांनी चेकअप करून घेतले व 123 लोकांनी रक्तदान केले. तसेच दुसर्‍या दिवसी 7 जुन ला वडगाव चंद्रपूर परीसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन विविध प्रकारचे 50 झाडे लावण्यात आली व मुवी कास्टीग मध्ये उद्योग मुवीसाठी विविध क्षेत्रातुन आलेले 60 कलावंता चे ऑडीशन घेण्यात आले.

असा हा उपक्रम पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आला आहे. “झाडे लावा झाडे जगवा” “आता चालवा एकच चळवळ, झाडे लावा करा हिरवळ” असा जयघोष डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांनी केला व हा उपक्रम यशस्वी ठरला,हे मात्र विशेष! 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                        *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here