Home
Home Breaking News हातात तलवार घेऊन दहशत पसरविण्याचे तयारीत असलेल्या इसमास सिंदेवाही पोलिसांनी केली अटक.

हातात तलवार घेऊन दहशत पसरविण्याचे तयारीत असलेल्या इसमास सिंदेवाही पोलिसांनी केली अटक.

0
107

                         सिंदेवाही 

                  हॅलो चांदा न्युज

सिंदेवाही(ता.प्र.):- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलिस स्टेशन क्षेत्र अंतर्गत
हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या इसमास सिंदेवाही पोलिसांनी वेळीच अटक केल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, हे मात्र विशेष!

सविस्तर वृत्त असे की दिनांक 17/06/2025 चे 05.00 वा. ते 05/45 वा दरम्यान सिंदेवाही शहरातील पेट्रोलिंग दरम्यान यातील आरोपी नामे शिवराज सुनील उटलवार, वय 24 वर्ष , रा. विद्यानगर कॉलोनी, सिंदेवाही हा अंधाराचा फायदा घेऊन शहरातील पानठेल्याच्या जवळ घातपात करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या हातात एक धारदार शस्त्र तलवार घेऊन मिळून आला. पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या व या आरोपी विरूद्ध अपराध क्रमांक – 213/2025 नुसार कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 122 म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.

सदर ची कामगिरी चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली स.फौ. चंद्रभान सोनवणे व इतरांनी केली आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,94221
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here