Home
Home चंद्रपूर निशिकांत रामटेके यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

निशिकांत रामटेके यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

0
88

                              चंद्रपूर

                         हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(वि. प्र.): चंद्रपूर चे पोलिस अधीक्षक यांनी काढलेल्या बदली आदेशानुसार चंद्रपूर सायबर पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत निशिकांत रामटेके यांची चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

दिनांक 21 जून रोजी 19.55 मिनिटांनी निशिकांत रामटेके हे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर झाले त्यानंतर त्यांनी तेथील सर्व कामकाज समजून घेतले 9.30 वाजता च्या दरम्यान चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांची बदली अर्ज शाखेचे व भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

निशिकांत रामटेके हे एक अनुभवी पोलीस निरीक्षक असून त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनचे पदभार स्वीकारले आहे त्यामुळे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून ते कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यशस्वी होतील असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.

साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथील चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस अधिकारी यांच्या बदल्याबाबत शासनाने निर्गमीत केलेले सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक-२, १६ फेब्रुवारी २०१५ तसेच पोलीस महासंचालक, म.राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक पोमसं ३ अधिसुचना / १४ / २०१४ / ७३, २५ फेब्रुवारी २०१५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हा बदली आस्थापना मंडळाच्य सर्वानुमते प्रशासकिय कारणास्तव पोलीस निरीक्षक यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणुक केली आहे.

तसेच १८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उपनिरीक्षक यांची सुद्धा आज बदली करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रानुसार मिळाली आहे, हे मात्र विशेष!

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here