चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर | २१ जून २०२५ – “संगीतमय योगा करा, निरोगी राहा!” या प्रेरणादायी संकल्पनेतून जागतिक योग दिनानिमित्त परिवर्तन योगा फाउंडेशन, चंद्रपूर तर्फे आझाद गार्डन पार्किंग ग्राउंड चंद्रपूर मध्ये भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 
हा योग महोत्सव कार्यक्रम शनिवार, २१ जून रोजी सकाळी 5.30 ते 8.30 या वेळेत , आझाद गार्डन पार्किंग ग्राउंड येथे पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे संगीतमय योग, एरोबिक्स योगा, योगनृत्य, प्राणायाम व विविध योग साधनांचे सजीव प्रात्यक्षिक. तसेच वरिष्ठ योग प्रशिक्षकांचा सन्मान व सत्कार, तसेच प्रमाणपत्र वितरण व योग साधकांचा गौरव असे उपक्रमही राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6 वाजता दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अशोक वासलवार तसेच मंगेश जुमडे यांची उपस्थिती लाभली!
या कार्यक्रमासाठी.. समाजसेवा हीच ईश्वर सेवा व करो योग रहो निरोग हा संदेश जनतेला देण्याकरिता परिवर्तन योगा फाउंडेशनचे. अध्यक्ष शशिकांत मस्के, सचिव रवि गुरूनुले, कोषाध्यक्ष नानाभाऊ गरमडे , नरेंद्र निंबाळकर, रणजीत महाजन, संजय गरमडे ,एकनाथ रासेकर शरद माहोरे ,पुरुषोत्तम कडवे व इतर सर्व योगसाधकांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात चंद्रपूरतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत योग दिनाच्या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला.! आयोजकांनी या यशस्वी सहभागाबद्दल उपस्थितांचे आभार मानले.
























